- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटात १९६९ मध्ये तत्कालीन खारभूमी विकास मंत्री अॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी प्रत्यक्ष फिरून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समुद्र संरक्षक बंधारे बांधून खारेपाटातील भातशेती संरक्षित करण्याकरिता राज्य सरकारकडे योजना सादर केली होती. त्यानंतर याच खारेपाटातील हजारो एकर भातशेती संरक्षक बंधारे फुटून खाºया पाण्याखाली जावून नापिकी झाली. परंतु ४९ वर्षांच्या कालखंडात कोणत्याही राज्य सरकारचे खारभूमी विकास मंत्री या खारेपाटात फिरकले नाहीत.तब्बल ४९ वर्षांनी राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात येवून मानकुळे, सोनकोठा, हाशिवरे, पोफेरी आणि नवीन मिळकत या खारभूमी योजनांची खारभूमी विकास विभागाच्या अधिकाºयांसमवेत पाहणी केली. याबद्दल खारेपाटातील शेतकºयांनी आनंद व्यक्त केला आहे.मात्र खारभूमी विकास मंत्री रावते यांनी या त्यांच्या दौºयात संरक्षक बंधारेफुटीच्या समस्येने ग्रस्त शेतकºयांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली असती तर अधिक आनंद झाला असता. समस्याग्रस्त शेतकºयांना ‘आपले सरकार’ बरोबर प्रत्यक्ष खारभूमीच्या अडचणी, आपत्कालीन योजना व व्यवस्थापन, रोजगाराच्या संधी आणि खारेपाटातील शेतकºयांनीच तयार केलेला नावीन्यपूर्ण समृद्ध खारेपाटाचा पथदर्शी प्रकल्प याबाबत बोलता आले असते, अशी भूमिका या दौºयाच्या निमित्ताने श्रमिक मुक्ती दलाच्या महिला शेतकरी प्रतिनिधी मधुरा भास्कर पाटील आणि सुधा राजन भगत यांनी रविवारीच जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.खारभूमी विकास विभागाच्या अधिकाºयांनी खरेतर या दौºयाबाबत माहिती शेतकºयांना देणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी देखील ती दिली नाही. जिल्हाधिकारी या नात्याने आपण खारभूमीच्या प्रश्नाबाबत खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीचे आयोजन केले तर खारभूमीच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होवून अनुत्पादक खारजमिनी पुन्हा उत्पादक होवू शकतात.त्याचबरोबर पालकमंत्री पाणंद रस्ते, भात खाचरातील मत्स्यशेती, विशेष जिताडा माशांचे उत्पादन,संरक्षक बंधाºयाला लागून सोलर वीजनिर्मिती यातून स्थानिक रोजगारांच्या संधी पुन्हा उपलब्ध होवू शकतात असा आमचा विश्वास असल्याचे या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.खारबांध बंदिस्ती नव्याने करण्याचे सूतोवाचखारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या रविवारच्या दौºयादरम्यान पाहणी करताना बंगलाबंदर ते हाशिवरेखार हा सुमारे साडे आठ किमी लांबीचा समुद्र संरक्षक बंधारा त्याचबरोबर माणकुळे खारबांध बंदिस्ती नव्याने करण्याचे सूतोवाच केले आहे. खारेपाटीतील फुटलेल्या संरक्षक बंधाºयांचा प्रश्न सोडविण्याकरिता सर्व ते प्रयत्न करण्यात येतील असेही सांगितले. दौºयात त्यांच्या समवेत खारभूमी विकास विभागाचे अधिकारी, रायगड जि.प. विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सरपंच सुजित गावंड आदि उपस्थित होते.
तब्बल ४९ वर्षांनी सरकारचे खारभूमी विकास मंत्री खारेपाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 3:20 AM