खरीप हंगामासाठी २००० क्विंटल बियाण्यांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:47 AM2018-05-23T02:47:21+5:302018-05-23T02:47:21+5:30

शेतात केलेल्या धूळवाफ्यावर धूळपेरणीसाठी बियाण्यांची जमवाजमव करण्यासाठी ते थेट कृषी केंद्रावर धाव घेऊ लागले आहेत.

In the Kharif season, arrival of 2000 quintals seeds | खरीप हंगामासाठी २००० क्विंटल बियाण्यांची आवक

खरीप हंगामासाठी २००० क्विंटल बियाण्यांची आवक

Next

पेण : येत्या आठ-दहा दिवसांत पावसाचे आगमन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाची तयारी करण्यात गुंतले आहेत. शेतात केलेल्या धूळवाफ्यावर धूळपेरणीसाठी बियाण्यांची जमवाजमव करण्यासाठी ते थेट कृषी केंद्रावर धाव घेऊ लागले आहेत.
पेणमधील १८ हजार १०० हेक्टर लागवड क्षेत्रासाठी ३००० क्विंटल सुधारित व संकरित बियाण्यांची एकूण मागणी आहे. त्यापैकी कोकण विकास कृषी केंद्रावर २००० क्विंटल बियाण्यांची आवक उपलब्ध झाली असून, ती सर्व बियाण्ी पेण शहरासह ग्रामीण विभागातील २२ केंद्रांवर पोहोच करण्यात आल्याचे कोकण कृषी विकास केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.
पेण तालुक्यातील खरीप हंगाम २०१८साठी तालुका कृषी विभागाने ३००० क्विंटल बियाण्यांपैकी सध्या कोकण कृषी विकास सेवा केंद्रावर २००० क्विंटल बियाण्यांची आवक उपलब्ध झाली आहे. यामध्ये विविध जातीची बियाण्ी असून नव्वद, शंभर, एकशेवीस दिवसांत तयार होणाऱ्या व भरघोस उत्पन्न देणाºया भात बियाण्यांच्या प्रजातीचा समावेश असून त्या पाच, सहा, दहा, बारा व पंचवीस किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. प्रकारानुसार ८५० रुपये, ९०० रुपये, ९५० रुपये अशा किमती असून दरवर्षीप्रमाणेच बियाण्यांच्या किमती आहेत.
शेतकºयांसाठी सर्वत्र बियाणी उपलब्ध असून पेण, वडखळ, शिर्की, वढाव, आमटेम, कामार्ली, कळके, तांबडशेत, वरसई, खरोशी या ठिकाणच्या सर्व कृषी सेवा केंद्रावर बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संकरित व सुधारित बियाण्यांच्या खरेदीसाठी त्या-त्या केंद्रावर बियाणी खरेदी करावीत, याशिवाय पेण शहरात कोकण कृषी विकास केंद्र, पेण खरेदी-विक्री संघ, समर्थ बियाणे केंद्र, के. एन. वैरागी व सह्याद्री बियाणे केंद्रावर सर्व प्रकारातील बियाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तालुका कृषी अधिकारी निंबाळकर व पेण पं. समितीचे कृषी अधिकारी यांनी बियाण्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी घेतले आहेत. एकंदर खरीप हंगाम २०१८ची जय्यत तयारी सुरू आहे.

Web Title: In the Kharif season, arrival of 2000 quintals seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी