- मिलिंद अष्टीवकर ल्ल रोहाराज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगत होणाऱ्या खोदकामामुळे भारतीय दूरसंचार निगमला (बीएसएनएल) फटका बसत आहे. सततच्या होणाऱ्या खोदकामांमुळे भारत संचार निगमची या रस्त्यांच्या बाजूने टाकलेली ओएफसी आॅप्टीकल फायबर केबल तुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ही केबल ब्रेक झाली की बीएसएनएलची मोबाइल, लँडलाईन, ब्रॉडबँड आदी सेवा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे दोन- दोन दिवस ही सेवा ठप्प राहते. याचा थेट परिणाम व्यापार, बँका, एटीएम, पेट्रोल पंप आदी नागरी व्यवहारांवर होत आहे. योग्य पैसे मोजूनही ग्राहक बीएसएनएल सेवेने त्रस्त झाले आहेत.आॅनलाइनच्या कामात कनेक्टिव्हिटीला सर्वाधिक महत्त्व आहे. अॅडव्हान्स टेक्नालॉजीचे जसे फायदे आहेत, त्याच प्रमाणात या सेवेचा त्रास देखील कनेक्टिव्हिटी ठप्प झाल्यावर नागरिकांना होतो. मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये काही वेळा अपवादात्मक परिस्थिती वगळता ही सेवा सहसा खंडित होत नसली तरी, छोट्या शहरांमध्ये व ग्रामीण भागांत मात्र वारंवार खंडित होणाऱ्या बीएसएनएल सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.जागोजागी रस्त्याच्याकडेला होणाऱ्या खोदकामामुळे ती खंडित होते. याचा थेट परिणाम प्रामुख्याने व्यापारी, बँका, एटीएम, पेट्रोल पंप आदी ठिकाणी नागरिकांवर होतो. मध्यंतरी मुंबई -गोवा हायवेच्या सुरू झालेल्या कामांमुळे तसेच राज्य आणि राष्ट्रीय मार्गाच्या बाजूने पाइपलाइन, इलेक्ट्रीक केबल आदी टाकण्याच्या कामामुळे बीएसएनएलची ओएफसी आॅप्टीकल फायबर केबल तुटण्याचे प्रक ार घडत आहेत. या केबलला काही झाल्यास ही सेवा बंद पडते. बंद पडलेली सेवा पूर्ववत करण्यासाठीची यंत्रणा बीएसएनएल रोहाकडे नाही, यासाठी पेण येथून ट्रान्समिशन व्हिंगचे युनिट येथे बोलावले जाते. त्यानंतर सेवा सुरळीत केली जाते.गेल्या आठवड्यात सेवा ठप्प येथील यशवंतखार गावाच्या हद्दीत झालेल्या खोदकामामुळे गेल्या महिन्यात ही सेवा ठप्प झाली होती. रोहा तालुक्यात हे वारंवार घडत असल्याने नागरिक गेली काही वर्षे त्रस्त आहेत. गेल्या सप्ताहात दोन दिवस रोह्यात बीएसएनएल मोबाइल, लँडलाइन, ब्रॉडबँड आदी सेवा ठप्प झाली होती. कनेक्टिव्हिटीचा त्रास कमी अधिक प्रमाणात चार दोन दिवस आड कायम होत आहे. बीएसएनएलच्या खंडित सेवेमुळे नागरिक त्रस्त आहेत.बंद पडलेली सेवा पूर्ववत करण्यासाठीची यंत्रणा भारतीय दूरसंचार निगम रोहाकडे नाही, यासाठी पेण येथून ट्रान्समिशन व्हिंगचे युनिट येथे बोलावले जाते. आणि हे युनिट येथे येऊन खंडित झालेली कनेक्टिव्हिटी जोडून ही सेवा रिस्टोअर करतात, त्यानंतर सेवा पूर्ववत होते, मात्र वारंवार सेवा खंडित होत आहे.रस्त्यांच्या बाजूची ओएफसी केबल खोदकामामुळे तुटण्याचे प्रक ार घडत आहेत. दुरूस्ती तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी पेण येथून ट्रान्समिशन व्हिंगला बोलावून खंडित झालेली कनेक्टिव्हिटी रिस्टोअर केली जाते. - व्ही.बी. डोळे, उपमंडळ अभियंताकनेक्टिव्हिटी खंडित होण्याने या सेवेचा सर्वाधिक फटका बँक ांना बसत आहे, त्याचा त्रास ग्राहकांनाही होतो. त्यामुळे एटीएम सेवाही खंडित होते. या सेवेत सुधारणा करणे आवश्यक आहे. - संजय सुमंत, व्यवस्थापक, एसबीआयबीएसएनएलच्या सेवेत कायम बिघाड होत असतात, पेट्रोल पंपाचे सर्व कामकाज आॅनलाइन चालते. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका आमच्या व्यवसायाला बसत आहे. आॅनलाइन डेबिट, के्रडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना त्रास होत आहे.- सचिन शेडगे, पंप मालक
खोदकामाचा बीएसएनएलला फटका
By admin | Published: April 15, 2016 1:05 AM