खोपोलीमधील धबधब्यांवर प्रवेशबंदी; रायगडमध्ये १ जूनपासूनच निर्बंधांची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:00 AM2018-07-07T03:00:04+5:302018-07-07T03:00:21+5:30
पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पर्यटक आणि ट्रेकर्स मोठ्या संख्येने येत असतात. या काळात होणाऱ्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्याकरिता कर्जत उपविभागीय दंडाधिकारी वैशाली परदेशी यांनी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव येथे पर्यटकांना ४ सप्टेंबर २०१८पर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.
अलिबाग : पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पर्यटक आणि ट्रेकर्स मोठ्या संख्येने येत असतात. या काळात होणाऱ्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्याकरिता कर्जत उपविभागीय दंडाधिकारी वैशाली परदेशी यांनी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव येथे पर्यटकांना ४ सप्टेंबर २०१८पर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.
तर रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गडकिल्ले, धबधबे आणि जलाशय या ठिकाणी १ जूनपासूनच निर्बंध लागू केले आहेत.
मद्यपींची हुल्लडबाजी व बेकायदा मद्य विक्री या पार्श्वभूमीवर कर्जत उप विभागीय दंडाधिकारी वैशाली परदेशी यांनी
खालापूर तालुक्यातील खोपोली येथील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव या ठिकाणी व त्यापासूनच्या १ किमी अंतराच्या परिसरात ५ जुलै २०१८ ते ४ सप्टेंबर २०१८ या कालावधीत बंदीचे आदेश लागू केले आहेत.
कारवाई करणार
जिल्ह्यात येणाºया ट्रेकर्सनी अधिकृत संस्था संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी जावे. त्याचबरोबर गड, किल्ल्यावर जाण्यापूर्वी वन विभागाच्या स्थानिक यंत्रणेकडे नोंदणी करावी. गावातील माहीतगार माणसास सोबत घेऊन जावे. मद्यपान करून भ्रमंतीस जाणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, सोबत मद्य घेऊन जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे यावर बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यास जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.