काळ नदीचा कोल्हापुरी बंधारा तुडुंब

By admin | Published: December 6, 2015 12:16 AM2015-12-06T00:16:07+5:302015-12-06T00:16:07+5:30

महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीवरील कोलाड लघुपाटबंधारे विभागामार्फत नोव्हेंबर महिन्यात कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा घालून पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे नदीचे

Kolhapuri Bondara Tudumba of Kala river | काळ नदीचा कोल्हापुरी बंधारा तुडुंब

काळ नदीचा कोल्हापुरी बंधारा तुडुंब

Next

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीवरील कोलाड लघुपाटबंधारे विभागामार्फत नोव्हेंबर महिन्यात कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा घालून पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे नदीचे पात्र संपूर्ण भरून बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने यावर्षी बिरवाडी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे.
अवकाळी पडलेल्या पावसामुळे बिरवाडी काळ नदीपात्रातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत वापराकरिता उपलब्ध होणार असल्याने या परिसरात एप्रिल, मे, जून या पहिला आठवड्यामध्ये निर्माण होणारी पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे. या पाण्यावर आजूबाजूच्या परिसरात शेतकरी शेती फुलवत असतात.
खरवली, काळीज, बिरवाडी, निगडे, वडघर, मोहोत, भिवघर आदींसह १० गावांच्या पाणी योजना काळ नदीपात्रातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. डिसेंबर महिन्यात पाणी वाहत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे. गेल्या २५ ते ५० वर्षांच्या कालावधीमध्ये प्रथम डिसेंबर महिन्यामध्ये बिरवाडी काळ नदीवर बांधण्यात आलेला क ोल्हापुरी बंधारा ओसंडून वाहत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर)

Web Title: Kolhapuri Bondara Tudumba of Kala river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.