वरसोलीच्या प्रतिजेजुरीत सदानंदाचा यळकोट
By निखिल म्हात्रे | Published: December 18, 2023 04:03 PM2023-12-18T16:03:41+5:302023-12-18T16:03:51+5:30
रायगडसह ठाणे, वर्सोवा व मुंबई येथील कोळी बांधवांनी खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती.
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील प्रतिजेजुरीत यळकोट, यळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट ...असा जयघोष करीत चंपाषष्ठी उत्सव साजरा झाला.
रायगडसह ठाणे, वर्सोवा व मुंबई येथील कोळी बांधवांनी खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. चंपाषष्ठी महोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. हाच उत्सव देव दिवाळीची सुरुवातही मानला जातो आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील धार्मिक उत्सवांमध्ये अत्यंत वैभवशाली मानला जातो.
वरसोली गावात परंपरेनुसार चंपाषष्ठीचा हा उत्सव अशाच पद्धतीने साजरा केला जातो. येथील खंडोबाचे मंदिर भक्तांचे तीर्थक्षेत्र बनले आहे. खंडोबाचा उत्सव अमावस्यापासून सुरू होतो. यामध्ये पारायण करून चंपाषष्ठी हा दिवस खंडोबाचा जन्मदिवसाच्या रूपात मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी खंडोबा मार्तंडाला वांग्याचे भरीत म्हणून नैवेद्य अर्पण केला जातो.