कोळी बांधवांची इंडस्ट्रियल असोसिएशन कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 03:13 AM2018-01-11T03:13:54+5:302018-01-11T03:14:50+5:30
रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.
धाटाव : रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. या धर्तीवर रोहा तालुक्यातील कोळी बांधवांनी बुधवारी एकत्र येऊन रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कार्यालयावर जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. या धरणे आंदोलनाने मात्र संपूर्ण परिसर दणाणून गेला.
बुधवारी १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यावरून शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे, महाराष्ट्र कोळी समाज संघ रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली सबंध तालुक्यातील कोळी समाज बांधवांसह निघालेल्या मोर्चाने रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात रोहा नगरपालिकेच्या नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना महिला तालुका संघटक नीता हजारे, कोळी समाज तालुकाध्यक्ष मनोज भायतांडेल, शिवसेना शहर अध्यक्ष दीपक तेंडुलकर, बुवा साळवी आदींसह खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रोहा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधीक्षक संदीप येडे-पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यासह अधिकाºयांनी प्रवेशद्वारावर निवेदन स्वीकारले. येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनावर खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील एकूण १२९ मच्छीमार बांधवांनी सह्या केलेले पत्र निवेदनासमवेत देण्यात आले.
प्रजासत्ताकदिनी साखळी उपोषण
हे प्रदूषित पाणी साळाव येथे समुद्रात सोडत नाही तोपर्यंत मासेमारी करणाºया कोळी बांधवांना नुकसानभरपाई देण्याचे ठरले असताना रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन यांना वारंवार भेटल्यानंतर मागणी मान्य केली, परंतु नुकसानभरपाई देण्यास आजवर टाळाटाळ करीत आहेत. असोसिएशनच्या अधिकाºयांनी मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे हे धरणे आंदोलन करीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यानंतर येत्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला सकाळी ९ वा. प्रांत कार्यालय रोहा येथे न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषणास बसणार अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. हा प्रश्न सुटला नाही तर समाजातील तरु णांनी हा प्रश्न अहिंसेच्या मार्गाने नेला तर त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे पत्र समाज बांधवांनी दिले आहे.