होळी सणासाठी मुरुडमधील कोळी बांधव परतले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:51 AM2019-03-18T04:51:18+5:302019-03-18T04:52:08+5:30
मागील चार महिन्यांपासून वातावरणातील बदलल्यामुळे मासे फार अल्प प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे प्रमुख आर्थिक स्रोतावर गंभीर संकट असूनसुद्धा होळी सणात याचे कुठेही सावट दिसत नाही.
संजय करडे
मुरु ड - मागील चार महिन्यांपासून वातावरणातील बदलल्यामुळे मासे फार अल्प प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे प्रमुख आर्थिक स्रोतावर गंभीर संकट असूनसुद्धा होळी सणात याचे कुठेही सावट दिसत नाही. होळी सण साजरा करण्यासाठी असंख्य बोटी किनाऱ्यावर येत आहेत.
कोकणातील किनारपट्टी भागात मासेमारी या प्रमुख व्यवसायावर समस्त कोळी बांधवांचे जीवन अवलंबून आहे. खोल समुद्रात मासळी पकडून ती मुंबई येथील ससून डॉक येथे विकून तो आपल्या कुटुंबाचे पोषण करतो. कोळी समाज हा भावनिक व श्रद्धाळूसुद्धा आहे. कोकणातील समस्त कोळी समाजाचा आवडता सण म्हणजे होळी. होळी सुरू होण्याअगोदर खोल समुद्रात सापडलेली मासळी मुंबईत विकून आनंदात होड्या आपल्या मायभूमीत येत असतात. सध्या असंख्य होड्या मुरु ड तालुक्यातील नांदगाव, राजपुरी, एकदर, आगरदांडा, दिघी येथे येत असून, होळीसाठी मुंबईतून समस्त कोळी बांधव येत आहेत.
मुंबईतून निघताना बोटी विविध रंगबिरंगी कापडाच्या झुलीने सजविल्या जातात. विविध फुले, विविध रंगाच्या पताका, रंगबिरंगी झेंडे व कोळी लोक पारंपरिक वेशभूषा परिधान करून प्रथम खंदेरी येथे वेताळ देवाचे दर्शन घेऊन त्याची पूजा-अर्चा करून येणाऱ्या दिवसात चांगली मासळी मिळावी व समुद्रदेवतेपासून आपले सदैव रक्षण व्हावे, अशी वेताळ देवापुढे प्रार्थना करतात. सालाबादप्रमाणे या वेळीही मुरु ड येथील चंद्रकांत सरपाटील यांच्या दोन्ही नौका व मुरु ड तालुक्यातील समस्त कोळी बांधवांच्या नौका वेताळ देवाचे दर्शन घेऊन घरी परतलेल्या आहेत. होळी सणाच्या काही दिवस अगोदर या नौका आपल्या गावी दाखल होत असतात.
मुरु ड तालुक्यात सुमारे ६५० होड्या असून, या सागरीकिनाºयाला लागलेल्या आहेत. या सजलेल्या नौका बंदरात दाखल होत असताना संबंधित नौकांच्या घरची माणसे खूप आतुरतेने वाट पाहात असतात. मासेमारी करून आल्यानंतर सर्व कोळी बांधव बोटीवर काम करणाºया सहकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुख-दु:खात सामिल होऊन आपले आपापसातील संबंध दृढ करीत असतात. बोटीवरील एखादा खलाशी आर्थिकदृष्ट्या कमजोर असेल तर होळी सण साजरा करण्यासाठी आर्थिक मदत करीत असतात. होळीनंतर दुसºया दिवशी धूलिवंदनचा सणसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आनंदाची उधळण
च्या होळी सणाबाबत अधिक माहिती सांगताना एकविरा व कमलावती बोटीचे मालक चंद्रकांत बाबू सरपाटील म्हणाले की, कोळी बांधव होळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात. आपल्या वर्षभरातील आपापसातील सर्व वैमनस्य विसरून गुण्यागोविंदाने हा सण साजरा करीत असतात. या होळीमध्ये तरु ण व वृद्ध स्त्री-पुरु ष सर्व उपक्र मांमध्ये आवर्जून सहभागी होतात. विशेष म्हणजे, इतर जातींपेक्षा कोळी समाजाचा होळी सण हा प्रकर्षाने साजरा केल्याचे जाणवते. सर्व दु:ख विसरून आनंद उधळणार हा सण म्हणून समस्त कोळी समाज होळी सणाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहात असतो.