अलिबाग : सबका साथ सबका विकास आणि कोळी समाज भकास, राज्यातील कोळी समाजाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यांची सोडवणूक करण्यात गेल्या ६० वर्षांत कोणत्याही पक्षाला यश आलेले नाही, असा घणाघाती हल्ला विविध वक्त्यांनी कोळी महासंघाच्या महामेळाव्यात बोलताना केला. त्यावेळी भाजपाचे मंत्री, विधान परिषदेचे आमदार आणि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या तोंडावरच भाजपाचा उद्धार करण्यात आल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाल्याचे पाहायला मिळाले.भाजपावरील आरोप परतावून लावताना भाजपाने कोळी समाजाच्या विकासासाठी किती आणि कसे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत याचा पाढाच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रमेश पाटील, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी वाचून भाजपाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.कोळी महासंघांची शिखर संघटना असणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या शाखेने कोळी महासंघाच्या महामेळाव्याचे आयोजन केले होते. रविवारी पीएनपी नाट्यगृहात रायगड जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यातील कोळी बांधव मोठ्या संख्येने या महामेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याचे अध्यक्ष अणि प्रमुख मागदर्शक म्हणून रवींद्र चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते.भाजपा सुध्दा सत्तेवर येऊन आता साडेचार वर्षे झाली आहेत. त्यांनीही समाजासाठी विशेष काहीच केले नाही. रमेश पाटील यांना कोळी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी विधान परिषदेवर घेतानाही उशीर केल्याचा टोला कोळी महासंघाच्या महिला अध्यक्षा सुमन कोळी यांनी आपले विचार मांडताना लगावला.सबका साथ सबका विकास आणि कोळी समाज भकास असा थेट हल्लाच कोळी समाजाचे नेते रामकृष्ण केणी यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात कोळी समाजाची अवस्था होती. त्यामध्ये आता बदल होणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. वाल्मीकी यांनी रामायण लिहिले. ते आमचे पूर्वज आहेत. मात्र त्यांची पुण्यतिथी, जयंती सरकार साजरी करत नाही, असेही ते म्हणाले. पावसाळ््यात सुमारे तीन महिने मासेमारी बंद करण्यात येते. त्याकालावधीत मासेमारी करणाºयांना फार मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यासाठी सरकारने त्यांना त्या कालावधीतील अनुदान देण्याची गरज असल्याकडेही केणी यांनी लक्ष वेधले.भाजपा सरकारने आपल्या समाजातील रमेश पाटील यांना आमदारकी दिली म्हणून हुरळून जाऊ नका, असा सल्ला कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी यांनी उपस्थितांना दिला.याप्रसंगी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष चेतन पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टिळेकर, उल्हास वाटकरे यांच्यासह कोळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते.रायगड जिल्ह्यातून एक तरी आमदार हा कोळी समाजाचा निवडून गेला पाहिजे. त्यासाठी भाजपाने उमेदवार दिला तरी चालेल. कोळी समाजाचे जो पक्ष भले करेल त्याच्या पाठीशी कोळी समाजाची ताकद उभी केली जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.कोळी समाजाच्या मागण्याच एवढ्या प्रचंड आहेत की त्यांनीच माझे पोट भरले आहे. कोळी समाजाने भाजपावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. लोककल्याणाचा विषय येतो, तेथे भाजपा तो विषय मार्गी लावल्या शिवाय राहात नाही, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार रमेश पाटील यांचे भाषण सुरु झाल्यावर मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला. उपस्थितांच्या या वागण्यामुळे कोळी महासंघाचे युवा नेते तथा रमेश पाटील यांचे पुत्र चेतन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे मेळावे तुम्हीच करा आम्हाला बोलवू नका, तुमचे प्रश्नही आता आमच्यापर्यंत आणू नका, असा दमही त्यांनी आयोजकांना भरला.>विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतसबका साथ सबका विकास याबाबत चव्हाण म्हणाले, कामगार कष्टकरी, शेतकरी यांचे उत्पन्न एक रुपया असेल तर, ते दुप्पट करणे म्हणजे विकास करणे होय.भाजपाने महादेव कोळी समाजाला न्याय देताना सरकारी निर्णय काढून तब्बल २० हजार कोळी समाजातील नागरिकांचा प्रश्न सोडवला असल्याची आठवण चव्हाण यांनी करुन दिली.कोळी समाजासह अन्य समाजातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी ईबीसी सवलतीसाठी ५० हजार वार्षिक उत्पन्नाची अट केली. आमदार रमेश पाटील, बाळासाहेब पाटील यांनीही भाजपाने आजवर काय केले याचा पाढा वाचला.
कोळी महासंघाचा सर्वपक्षीय नेत्यांवर घणाघाती हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 3:09 AM