शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

कोलीवलीच्या सटू आईच्या यात्रेला आजपासून प्रारंभ

By admin | Published: January 09, 2016 2:16 AM

तालुक्यातील नेरळजवळील कोलीवली गावातील नवसाला पावणाऱ्या सटूआई देवीचा जत्रा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो

कर्जत : तालुक्यातील नेरळजवळील कोलीवली गावातील नवसाला पावणाऱ्या सटूआई देवीचा जत्रा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही या देवीचा जत्रा उत्सव शनिवारी (९ जानेवारी) व रविवार (१० जानेवारीला) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.नेरळपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलीवली गावात सटूआई देवीचे जागृत देवस्थान आहे. हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे. पौष महिन्याच्या पहिल्याच दिवशी या जत्रेचे आयोजन करण्यात येते.त्यामुळे या जत्रेनिमित्ताने भक्तगण येथे देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या जत्रेसाठी कर्जत तालुक्यासह रायगड, ठाणे, लोणावळा, खंडाळा, कल्याण, भिवंडी, अशा अनेक ठिकाणाहून भक्तगण येतात. शनिवारी सायंकाळी ४ वाजता सटूआई देवीचे पूजन, ५ वाजता एकादशी प्रासादिक भजन मंडळ चामटोली यांचे भजन, ७.३० वाजता देवीची पालखी मिरवणूक तर रात्री १० वाजता जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ नेवाळी यांचे भजन होणार आहे. रविवार सकाळी ८ वाजता सटूआई देवीचा जत्रा उत्सव होणार आहे. तरी दोन दिवस येणाऱ्या भाविकांनी या जत्रेत शांतता राखावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. (वार्ताहर)