शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला 
2
Supriya Sule : "खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष..."; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक
4
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
5
'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'
6
WTC Points Table : टॉपर टीम इंडियाला मोठा धक्का; फायनलचा मार्ग खडतर होण्याची भीती
7
Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले
8
IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी
9
Lawrence Bishnoi : "जेलमध्ये दरवर्षी ४० लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई"; भावाचा मोठा दावा
10
IND vs NZ : भारताचा दारुण पराभव! तीन दशकांनंतर न्यूझीलंडचा विजय; टीम इंडिया कुठे चुकली?
11
“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप
13
रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग
15
सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण
17
मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क
18
“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले
19
मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता
20
बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."

कोंढाणे धरणाचे पाणी कर्जत तालुक्याला मिळाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:11 AM

युती शासनाने कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित केले आहे. हे धरण कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्याचे पाणी कर्जत तालुक्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर केली आहे.

कर्जत : युती शासनाने कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित केले आहे. हे धरण कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्याचे पाणी कर्जत तालुक्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनात लाड यांनी, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम २०११ मध्ये सुरू करण्यात आले होते. त्या संदर्भात काही तक्रारी झाल्याने धरणाचे काम मधल्या काळात थांबविण्यात आले होते. मागील वर्षी कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदरचा निर्णय घेताना स्थानिकांना फक्त १० टक्के पाणीसाठा मंजूर केलेला आहे व उर्वरित पाणीसाठा सिडकोला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र पाणीसाठ्यासाठी जमीन देणाऱ्या कर्जत तालुक्यावर हा अन्याय आहे. सदरच्या धरणासाठी तालुक्यातील चार गावे प्रकल्पबाधित होऊनही स्थानिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळणार नसल्याने शेतकºयांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. कर्जत तालुका हा प्रामुख्याने पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेला तालुका असून यावरच लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. वर्षाकाठी लाखो पर्यटक पर्यटनासाठी तालुक्यात विविध गावांत येत असतात. त्या त्याठिकाणच्या पाणीटंचाईमुळे तालुक्यातील पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे. तालुक्याप्रमाणेच कर्जत शहर व शहरालगतच्या गावात नागरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे.सिडकोला देण्यात आलेले कोंढाणे धरण हे फक्त आणि फक्त पाण्यासाठी कर्जत तालुक्याला देण्यात यावे. सिडकोला कोंढाणे धरण देण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा व कोंढाणे धरण कर्जत तालुक्यासाठीच देण्यात यावे अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगड