शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

डिझेल परताव्याअभावी कोकणातील मच्छीमार त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:08 PM

आंदोलनाचा इशारा । पारंपरिक व्यावसायिकांवर कर्जबाजारीचे संकट

- संजय करडे

मुरुड जंजिरा : राज्य शासनाकडून कोकणातील मच्छीमारांना मार्च २०१७ पासून डिझेल परताव्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत असून, ही रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.

अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे मच्छीमारांना समुद्रात मासळी मिळत नसल्याने मच्छीमार कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी जसे आत्महत्या करतात, तशी वेळ मच्छीमारांवर आणू नका. किमान हक्काचा डिझेल परतावा तरी शासनाने तातडीने द्यावा, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा बैले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. या वेळी त्यांच्या समवेत सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू उपस्थित होते.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत घोषित करून नुकसानभरपाई देऊन दिलासा दिला आहे. या उलट समुद्रात दिवसेंदिवस मत्स्य दुष्काळ पडत आहे. त्यामुळे मच्छीमारांची अवस्था बिकट झाली आहे. या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य पर्याय समोर नसल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शासन मत्स्यदुष्काळही जाहीर करीत नाही, त्यामुळे कोकणातील मच्छीमार त्रस्त आहेत.

ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्रात अचानक उद्भवणाºया वादळाची मच्छीमारांमध्ये प्रचंड भीती आहे. मत्स्य विभागाने धोक्याचा इशारा देताच होड्या किनाºयावर आणल्या जातात. प्रसंगी होडीतील सामग्री फुकट जाते. या पार्श्वभूमीवर मच्छीमार संस्थांतील कर्मचाऱ्यांचे सहा महिने पगार होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

डिझेल परताव्याची रक्कम मार्च २०१७ पासून रायगड जिल्ह्यात मच्छीमारांना अदा केलेली नाही. यंदाचे २०१९ चे वर्ष मच्छीमांरासाठी दु:खाचे गेले असून, या वर्षात मासेमारी अत्यल्प प्रमाणात झाली असून मच्छीमारांचा सर्व खर्च वाया गेला असून, कोकणातील मच्छीमारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. तरी शासनाने डिझेल परताव्याची रक्कम लवकरात लवकर अदा करण्याची मागणी बैले यांनी केली आहे.मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची मागणीमत्स्यदुष्काळ जाहीर करावयास शासन का धजावत नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ऐन मासळी हंगामात कधी अवकाळी पाऊस तर वेगवान वारे, चंद्रप्रकाशाचा उद्रेक यामुळे गेले अनेक दिवस मासेमारी बंद करावी लागल्याने कोकणातील मासेमारी बंद आहे. त्यामुळे मच्छीमार कर्जबाजारी झाला आहे. शासनाने डिझेल परताव्याची रक्कम अदा करून मदतीचा हात द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा मच्छीमारांना दिला आहे. 

डिझेल परतावे दोन वर्षांपासून येणे बाकी आहेत, त्यामुळे मच्छीमार सदस्यांकडून बाकी वसूल होत नाही. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.- पांडुरंग आगरकर, अध्यक्ष,जय हनुमान मच्छीमार संस्थापत्रव्यवहार करूनही शासनाकडून डिझेल परतावा आलेला नाही. संस्थेकडे पैसे नसल्याने कर्मचाºयांचे सहा महिन्यांचे पगार देणे कठीण झाले आहे. डिझेल परतावा वेळेत न मिळाल्यास मच्छीमार संस्था अडचणीत येतील.- मनोहर मकू, उपाध्यक्ष,सागरकन्या मच्छीमार संस्था, मुरुड.