कोर्लई १९ बंगले प्रकरण; प्रशांत मिसाळ याना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:24 AM2023-04-14T00:24:49+5:302023-04-14T00:25:26+5:30
२० हजाराच्या जात जुमल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशांत मिसाळ यांना दिलासा मिळाला आहे.
अलिबाग : कोर्लई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगले प्रकरणात अटक झालेले माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना मुरुड न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. २० हजाराच्या जात जुमल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशांत मिसाळ यांना दिलासा मिळाला आहे.
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीवर कथित १९ बंगल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी ग्रामपंचायत सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली होती. मंगळवारी मुरुड प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश एस जी सरोदे यांच्या न्यायालयात प्रशांत मिसाळ यांना हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची गुरुवार १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रशांत मिसाळ यांची गुरुवारी १३ एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपली असल्याने मुरुड प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश एस जी सरोदे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायलयाने मिसाळ यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर मिसाळ यांच्यातर्फे न्यायलायकडे जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने मिसाळ याना जामीन मंजूर केला आहे. मिसाळ यांच्यातर्फे ऍड प्रवीण ठाकूर यांनी काम पाहिले. मिसाळ याना जामीन मंजूर झाल्याने मोठा दिलासा त्यांना मिळाला आहे.