कुडकी, कोंढेपंचतन धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:43 AM2018-07-09T03:43:43+5:302018-07-09T03:44:11+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेले तीन दिवस पाऊस तुफान बरसत आहे. परिसरातील कोंढेपंचतन व कुडकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे, तर कार्लेपंचतन धरण ५० टक्के भरले आहे.

 Kudki, Kondhanchanchatan dam overflow | कुडकी, कोंढेपंचतन धरण ओव्हरफ्लो

कुडकी, कोंढेपंचतन धरण ओव्हरफ्लो

googlenewsNext

बोर्ली पंचतन - श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेले तीन दिवस पाऊस तुफान बरसत आहे. परिसरातील कोंढेपंचतन व कुडकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे, तर कार्लेपंचतन धरण ५० टक्के भरले आहे. कोंढेपंचतन धरणावर मौजमजा करण्यासाठी परिसरातील तरु णवर्गाची गर्दी होत असली तर तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून दिघी सागरी पोलीस ठाण्याचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लावणीची कामे ठप्प पडली आहेत, त्यामुळे शेतकरी पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहे. बोर्ली पंचतन परिसरास पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, सर्व परिसर जलमय झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर तसेच दिघी-मोर्बा- माणगाव मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. तर मोर्बा गावाजवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने मार्ग बंद ठेवून ही वाहतूक लोणारे-गोरेगाव मार्गे वळविण्यात आली होती, त्यामुळे लांब पल्ल्याच्या एसटी बसेस उशिराने धावत आहेत.
पाऊस जोरदार पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ होत असून दिवेआगर, बोर्ली पंचतन, भरडखोल, कार्ले गावाच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असणाऱ्या कोंढेपंचतन लघु पाटबंधारे धरण ५० टक्के भरले आहे. या धरणाचे वैशिष्ट्य की धरण मोठे असून, या धरणास पाणी संचय होण्यासाठी जलस्रोत अतिशय कमी असल्याने १९६४च्या उभारणीनंतर हे धरण एकदाही १०० टक्के भरले नाही. तर वडवली गावाजवळील कुडकी म्हसळा तालुक्यातील पाभरा, संदेरी लघु पाटबंधारे धरण पूर्णत: भरले असून, त्यातून पाण्याचा काही प्रमाणात विसर्ग होत आहे. तर श्रीवर्धन शहरासह आराठी, जसवली, गालसुरे आदी गावांना पाणीपुरवठा करणारे धरणही सुमारे ५० टक्के भरले आहे.
बोर्ली पंचतन गावास सहा महिने पाणीपुरवठा करणारे व बोर्ली पंचतनपासून पूर्वेला दोन कि.मी. डोंगरात असलेले कोंढेपंचतन धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने तिथे सहलीसाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. रविवार असल्याने या ठिकाणी गर्दी होणार होती; परंतु जोराचा पाऊस पडल्याने धरणातून बाहेर पडणाºया पाण्याचा वेग जास्त असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भागामध्ये जाण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केल्याने तरु णवर्गाचा हिरमोड झाला तर कोंढेपंचतन धरण परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याची नजर आहे.

Web Title:  Kudki, Kondhanchanchatan dam overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.