पनवेल : कामगारनेते आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्याम म्हात्रे यांचे शनिवार, (९ जून)ला अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्यावर दादर येथील धन्वंतरी रु ग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे.खांदा कॉलनी येथील निवासस्थानाहून दुपारी श्याम म्हात्रे यांची अंत्ययात्रा निघाली. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री रवि पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील, जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदीसह सर्व पक्षीयनेते कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.कामगारांचा आधारवडगरीब, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त कामगार यांच्या न्याय्य हक्कांसाठी श्यामम्हात्रे अखेरच्या श्वासापर्यंत लढले. राज्यातील विविध शासकीय महामंडळे आणि सार्वजनिक उपक्र मांतील कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी त्यांनी मुंबई, नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाने कामगारांचा आधारवड हरपला, अशी प्रतिक्रि या व्यक्त होत आहे.
कामगारनेते श्याम म्हात्रे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 6:57 AM