शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

चिरनेरला राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार व आरोग्य शिबिर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 5:21 PM

पथनाट्यातून आरोग्य विषयक जनजागृती व प्रबोधन.

मधुकर ठाकूर, उरण : नेरूळ येथील डी. वाय. पाटील दिम टू बी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे ग्रामीण पुनर्रचना आरोग्य सेवा श्रमसंस्कार, सात दिवसीय निवासी शिबिर चिरनेर   येथे पार पडले.डी वाय पाटील संस्थेचे संस्थापक विजय ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्षा शिवानी पाटील,  कुलगुरू डॉ. वंदना मिश्रा  यांच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर पासून हे शिबिर सुरू झाले होते.

शिबिराचे उद्घाटन  प्राचार्या  दिपा रेड्डी, उपसरपंच सचिन घबाडी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, डॉ. सुधीर केणी, महागणपती मेडिकलच्या संचालिका सोनाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद मच्छिंद्र कानवडे, कार्यक्रम आधिकारी प्रा. सेरीना थिओडोर, सहकारी प्रा. अंजली यादव, तसेच अध्यक्ष सुशील वैष्णव, उपाधक्ष शितल इंगळे,  खजिनदार प्रांजल  घाडगे, निवृत्त समन्वयक कुणाल जैसवाल , प्रशासक ॲन्सी चेरियन, दीक्षा शर्मा, गटप्रमुख कु. श्वेता साळुंखे, कु, दत्तात्रय सुमभे, कु. सानिका पालवणकर, कु. हेंना एलसा ही सर्व मंडळी सदर शिबिराची  जबाबदारी पार पाडली . शिबिरात एकूण ६० शिबिरार्थी सहभागी झाले होते. शिबिरातील मुख्य उपक्रम म्हणजे ग्राम आरोग्य सर्वेक्षण, सामाजिक  सेवा श्रमदान, बाल माता आरोग्य सर्वेक्षण, वृक्ष रोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, व स्वच्छता जनजागृती हे असून,  श्रमदानांतर्गत शिबिरार्थींनी चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील तलाव, विहिरीचा परिसर तसेच  श्री महागणपती मंदिर परिसर आणि अक्कादेवी परिसर झाडून  स्वच्छ करण्यात आला. त्याचप्रमाणे चिरनेर गावातील ठीक ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले.

श्री महागणपती भक्त निवासाची देखील शिबिरार्थींनी रंगरंगोटी केली.  सात दिवसांच्या या मोहिमेत चिरनेर गावातील अनेक ठिकाणी जाऊन त्या त्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. एड्स या भयावह रोगाविषयी समाज प्रबोधन व जनजागृती व्हावी यासाठी रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर कमी वयात लग्न केल्याचे दुष्परिणाम आणि बालमाता संगोपन यातून आदिवासी बांधवांना  पथनाट्यातून आरोग्य विषयी जनजागृती व प्रबोधन केले. तसेच डेंगू, मलेरिया, पल्स पोलिओ निर्मूलन, तसेच स्वच्छ भारत अभियान, स्त्री पुरुष समानता बेटी बचाव बेटी पढाव याविषयी देखील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली. दरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील ३०० रहिवाशी नागरिकांच्या घरांना भेटी देऊन, शिबिरार्थीनी सामाजिक व आरोग्य विषयक  सर्वेक्षण केले. सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्य परिसर स्वच्छता याबाबत शिबिरार्थींनी अद्यावत माहिती गोळा करून त्याविषयीचे मार्गदर्शनही केले .

प्राथमिक शाळा चिरनेर येथील २३२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना पोषण आहार देण्यात आला. तर अक्कादेवी आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.नाट्य दिग्दर्शक संतोष ठाकूर, निवृत्त क्लास वन अधिकारी श्रीधर मोकल, माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मुंबईकर यांच्या सहकार्याने इंद्रायणीच्या डोंगरावर विविध जातीची झाडे लावून, याआधी रोपण करण्यात आलेल्या २०० झाडांना शिबिरार्थींनी पाणी दिले.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण