माणगावमधील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
By admin | Published: March 21, 2017 02:05 AM2017-03-21T02:05:13+5:302017-03-21T02:05:13+5:30
धुळे येथील शासकीय सेवेत असलेल्या डॉ. रोहित म्हामुणकर यांच्यावर रुग्णांच्या नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे
माणगाव : धुळे येथील शासकीय सेवेत असलेल्या डॉ. रोहित म्हामुणकर यांच्यावर रुग्णांच्या नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले होते. डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ माणगाव तालुक्यासह तसेच दक्षिण रायगडमधील सर्व डॉक्टरांनी सोमवारी २० मार्च रोजी कामबंद आंदोलन केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. केतन निकम, माणगाव मेडिकोजच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा शिंदे, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ. एम. एस. निकम यांनी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी कामबंद आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करीत माणगावचे उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे त्याचप्रमाणे माणगावच्या तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना निवेदन दिले. या संपात तालुक्यांतून ७५ डॉक्टरांनी सहभाग घेतला. अनेक ठिकाणी डॉक्टरांवर रु ग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ले होत असतात व अशा हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी होतात. माणगावमधील शासकीय रु ग्णालयातील डॉक्टरांवर या प्रकारचे गंभीर हल्ले झाले होते. त्यानंतर या रु ग्णालयात डॉक्टर यायला तयार होत नव्हते. डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबवावेत या संदर्भात पोलिसांनी डॉक्टराना संरक्षण द्यावे व त्यांची सुरक्षितता जपावी असे निवेदनात म्हटले आहे.
माणगावमधील डॉक्टरांनी दिलेले निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनी स्वीकारत रु ग्णांच्या नातेवाइकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेवू नये व संयम पाळावा असे आवाहन केले. तर डॉक्टरांनी सुद्धा आलेल्या रु ग्णांवर तातडीने उपचार करून उपचारासंदर्भात त्याची माहिती रु ग्णांच्या नातेवाइकांना द्यावी. त्या रोगावर डॉक्टर किंवा साधने आपल्या रु ग्णालयात उपलब्ध नसल्यास त्याची माहिती देवून पुढील पर्यायी व्यवस्था करण्यास सांगावे. माणगाव तळा तालुका संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक शेठ यांनी शासनाने देखील डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या बाबतीत कडक कायदे करून हल्लेखोरांवर कडक शिक्षा झाली पाहिजे. अशा घटनांना आळा बसलाच पाहिजे असे सांगितले. (वार्ताहर)