कळंब आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:07 AM2018-10-05T05:07:49+5:302018-10-05T05:08:05+5:30

रुग्णांचे होतात हाल : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; नागरिकांत नाराजी

Lack of basic amenities in Kalamb health center | कळंब आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव

कळंब आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव

googlenewsNext

कांता हाबळे 

नेरळ : कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने येथील रु ग्णांची मात्र गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कळंब परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे. या परिसरातील बहुतांश भाग दुर्गम डोंगराळ असून बहुसंख्येने वाड्या-पाड्यातील नागरिकांना तसेच आदिवासी रु ग्णांना प्राथमिक उपचारासाठी कळंब केंद्राचा एकमेव सरकारी आधार आहे.

विशेष म्हणजे या भागातील गरोदर महिलांना आपले उपचार व प्रसूतीसाठी या आरोग्य केंद्रात यावे लागते,साथीच्या आजाराबरोबरच विंचूदंश, सर्पदंशच्या रु ग्णांची संख्याही लक्षणीय असते. प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात तर या केंद्रात मोठ्या संख्येने रु ग्णांची गर्दी पहावयास मिळत असते. असे असताना येथील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या या केंद्राची दुरवस्था झाली असून मूलभूत सुविधांच्या अभावाने येथे उपचार घेणाºया रु ग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. आंतररु ग्ण विभागाची अवस्था बिकट असून वॉर्डमधील पंखे गायब झाले आहेत. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात आंतर रु ग्ण विभागाच्या छताला गळती लागत असून छताचे पाणी भिंतीत झिरपून भिंती ओल्या होत आहेत. परिणामी कुबट, दमट अशा वातावरणात रु ग्णांना राहावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रसूतीसाठी दाखल महिलांना तर मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे. पंखे नसल्याने नवजात शिशू व रु ग्णांना पुस्तके अथवा पुठ्ठ्याच्या साह्याने नातेवाईक वारा घालताना दिसत आहेत. काही जवळचे रु ग्ण हे आपल्या घरून पंखा आणून उपाययोजना करत आहेत, परंतु या भागात वारंवार खंडित होणाºया वीज पुरवठ्यामुळे व त्यावर पर्यायी व्यवस्था या केंद्रात नसल्याने रु ग्णांसह नातेवाइकांचे हाल होत आहेत. बाह्य रु ग्ण विभागाची अवस्थाही काहीशी अशीच आहे.आरोग्य अधिकाºयांचा कक्ष जरी सुस्थितीत असला तरी या केंद्राच्या प्रतीक्षा कक्षाच्या छताचे सिलिंगचे पत्रे निखळले असून कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने कोणत्याही क्षणी येथे अपघात होऊ शकतो.खेदाची बाब म्हणजे मागील काही वर्षांपूर्वीच कळंब आरोग्य केंद्राचे लाखो रु पये खर्चून नूतनीकरण करण्यात आले असतानाही या केंद्राची दुरवस्था झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. आरोग्य विभागाने या केंद्राच्या स्थितीकडे गांभीर्याने पाहून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून नवीन बांधलेल्या आंतररु ग्ण इमारतीचे छत पावसाळ्यात गळत आहे. परिणामी येथे उपचार घेणाºया लोकांची गैरसोय होत आहे. वॉर्डात पंखे चालू स्थितीत नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- राहुल बदे, उपाध्यक्ष, युवा मोर्चा भाजपा कर्जत तालुका

मी बाळंतपणासाठी दाखल आहे. दवाखान्यात पंखे नसल्याने डासांचा त्रास होत असून बाळास हाताने वारा घालावा लागत आहे. आमच्या बाजूच्या रुग्णाने हसीन शबिर पालटे यांच्या नातेवाइकांनी घरून आणलेला पंखा लाइट नसल्याने तोही बंद आहे.
- सरिता अनंता मुकणे,
रु ग्ण-माले कातकर वाडी

आमच्यासाठी रु ग्ण सेवा व त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, परंतु नवीन बांधलेल्या इमारतीचे छत पूर्णपणे गळत आहे. त्यामुळे भिंती ओल्या झाल्याने विद्युत उपकरणे शॉर्टसर्किट झाल्याने बंद आहेत, परिणामी चार खाटांचा आंतर रु ग्ण विभाग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच आंतररु ग्ण विभाग, प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रि या विभाग ही पावसाळ्यामुळे बाधित झाले आहे. दुरुस्तीसाठी आम्ही बांधकाम विभागास, तसेच आरोग्य विभागास कळविले आहे.
- डॉ. शामसंग पावरा,
आरोग्य अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र कळंब
 

Web Title: Lack of basic amenities in Kalamb health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड