शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रायगडमधील लाखमोलाच्या दहीहंडी स्पर्धा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 5:30 AM

कोरोना महामारीमुळे आयोजकांचा निर्णय : दहीकाला उत्सवात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे कठीण

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या आणि लाखमोलाच समजल्या जाणाऱ्या दहीहंडी स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याचे स्वास्थ्य बिघडले असताना, दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून गोविंदांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून दहीहंडी स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

देशभरात अनलॉक होत असताना, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे, तसेच सामाजिक कार्यक्र म, धार्मिक सण, सांस्कृतिक कार्यक्र म आयोजनावर अद्यापही बंदी आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव होणार की नाही, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. त्याच दरम्यान, आता जिल्ह्याच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाºया दहीहंडी स्पर्धांचे आयोजन करणाºया मंडळांनी आपल्या दहीहंडी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांनी घेतला आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ असं म्हणत दहीहंडी स्पर्धा आयोजकांनी रद्द केल्या आहेत. करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे हा एकमेव पर्याय आहे. अशा वेळी दहीहंडीसारख्या मानवी मनोºयांचा खेळ कसा खेळणार, शासनाच्या सूचना असताना, गोविंदांची एकत्र येण्याची जबाबदारी कशी घेणार, असे अनेक प्रश्न उभे राहिल्याने हा उत्सव अगदी साधेपणाने रायगडात करण्यात येणार आहे, तसेच या खेळाचे आयोजन केल्यास पोलीस यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे, पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी जिल्ह्यातील दहीहंडी आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत दरवर्षी कोकणासह महाराष्ट्रातील विविध शहरांत गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव, रोहा, महाड आदी ठिकाणी मानाच्या दहीहंडी बांधण्यात येतात, या हंड्या फोडण्यासाठी विविध ठिकाणांहून दहीहंडी पथके येत असतात.परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, हा निर्णय घेतला आहे.या दहीहंडी रद्द : दहीहंडी उत्सवात सोशल डिस्टन्सिंग, मास्क बांधणे अशा नियमांचे पालन करण्यात अडचणी येणार आहेत, हे सर्व लक्षात घेत यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही काही महत्त्वाच्या मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करण्याचे जाहीर केले आहे. अलिबाग शहरातील प्रशांत नाईक मित्रमंडळाची, भारतीय जनता पार्टी, तसेच शिवसेनेची होणारी मानाची हंडी रद्द करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील नितीन सावंत मित्रमंडळ व सुनील गोगटे मित्रमंडळाची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच पेण रोहा माणगाव तालुक्यातील ही छोट्या-मोठ्या दहीहंडी रद्द करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूची महामारी सुरू असताना, या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी दहीहंडीसारखा मानाचा समजाला जाणारा उत्सव या वर्षी आम्ही रद्द केला आहे, तसेच नागरिकांना कोरोनाविरहित जीवन जगता यावे, अशी प्रार्थना श्रीकृष्णाजवळ केली आहे. - अ‍ॅड.महेश मोहिते, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Raigadरायगड