खालापुरात लाखांची गावठी दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:12 PM2019-04-11T23:12:42+5:302019-04-11T23:12:56+5:30
खालापूर पोलिसांना इरशाळ गडाच्या पायथ्याशी इरशाळवाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोपाडा : तालुक्यातील दुर्गम भागात चालत असलेल्या हातभट्टीविरोधात खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजीत कार्इंगडे यांनी मोहीम उघडली असून जवळपास लाखाची गावठी दारू नष्ट करीत १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
खालापूर पोलिसांना इरशाळ गडाच्या पायथ्याशी इरशाळवाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वजीत कार्इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रसाद पाटील, खंडागळे, रूपनवर यांनी साध्या वेशात छापा टाकला असता, पाच व्यक्ती दारूच्या भट्टी लावून दारू तयार करताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ८२,६०० रु पये किमतीचा गावठी दारूचा माल जप्त केला आहे. तसेच पळून गेलेल्या पाच व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
दुसरा छापा बोरीमाळ ठाकूरवाडी येथे टाकून एकूण १२,१०० रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त के ले. हातभट्टीची तयार दारू व दारू गाळण्याचे साहित्य भांडी, दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारा उग्र वासमिश्रित द्रव पदार्थ असा माल विनापरवाना गैरकायद्याने जवळ बाळगल्यामुळे पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.
पेणच्या आसानी डोंगरभागात दारूभट्टीवर कारवाई
च्वडखळ : पेण पोलिसांनी गावठी दारूविरोधातील मोहीम तीव्र केली असून गावठी दारूविक्रे त्यांचे व हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वी खरोशी गावातील गावठी दारूभट्टीवर कारवाई करून आठ हजारांचा गावठी दारूसाठा नष्ट करण्यात आला होता, च्त्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी आसानी, बंगलावाडी जंगल भागात जाऊन पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, पो.कॉ. मारु ती पांढरे, अजित काळभोर, होमगार्ड दरवडा, श्रीवीर व व्यसनमुक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी जाऊन पाच हातभट्टी फोडल्या, च्या वेळी २०० लीटरच्या प्लॅस्टिकच्या टाक्या अशा एकूण तीन हजार लीटर दारूचे रसायन नष्ट केले. पोलिसांनी आठवडाभरात सलग कारवाई केल्याने दारूभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.