महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादन : महाडमध्ये दलालांचा सुळसुळाट, शेतक-यांची अडवणूक, मोबदला वाटपामध्ये गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:25 AM2017-09-09T03:25:38+5:302017-09-09T03:25:41+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यास महाडमध्ये विलंब होत असल्याने लाभार्थी शेतकºयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्याचा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत.
संदीप जाधव
महाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यास महाडमध्ये विलंब होत असल्याने लाभार्थी शेतकºयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्याचा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत. संपादित जमिनीचे कागदपत्र व्यवस्थित असतानाही लाभार्थी शेतकºयांना मोबदला देण्यास महाड प्रांताधिकारी कार्यालयाकडून अडवणूक केली जात असल्याची बाब उघडकीस येत आहे. या मोबदला वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचे आरोप केले जात असून मिळणाºया मोबदल्यातून दलालांमार्फत महसूल अधिकाºयांकडून टक्केवारीची देखील अटकळ घातली जात असल्याची चर्चा महाडमध्ये उघडपणे केली जात आहे.
महामार्गावरील वीर ते भोगाव खुर्द या ४६ कि.मी. च्या मार्गासाठी भूसंपादन व मोबदला वाटपाचे काम महाड प्रांताधिकारी यांच्याकडे असून या २१ गावांच्या हद्दीतील शेतकºयांकडून या संपादनाबाबत ६७० हरकती प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत या हरकतींवर कुठलाही निर्णय दिला जात नसल्यामुळे हरकतदार शेतकरी सध्या प्रांताधिकारी कार्यालयात खेटा मारताना दिसत आहेत. यापैकी काही तक्र ारी या महसूल कर्मचाºयांना हाताशी धरून दलालांमार्फत करण्यात आल्याची माहिती उजेडात येत आहे. महाड शहरालगतच्या करंजखोल येथील बहुतांश शेतकºयांचे जमिनींचे कागदपत्र असूनही या गावांतील एकाही लाभार्थाला अद्यापही मोबदला मिळालेला नाही. दोन दिवसांपूर्वी या शेतकºयांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेवून जमिनीचा मोबदला त्वरित देण्याची मागणी केली होती. येत्या काही दिवसांत मोबदला मिळाला नाही तर उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.