रायगड जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत 1.74 लाख  शेतकऱ्यांचा लॅन्ड डेटा अपडेट! 1.12 लाख जणांचे ई-केवायसी पूर्ण

By जमीर काझी | Published: September 9, 2022 07:49 PM2022-09-09T19:49:42+5:302022-09-09T19:50:42+5:30

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  ऐन गणेशोत्सवाच्या काळातही कोणतीही सुट्टी न घेता या  हे काम  पूर्ण केले.

land data update of 1 74 lakh farmers under pm kisan samman scheme in raigad district complete e kyc of 1.12 lakh people | रायगड जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत 1.74 लाख  शेतकऱ्यांचा लॅन्ड डेटा अपडेट! 1.12 लाख जणांचे ई-केवायसी पूर्ण

रायगड जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत 1.74 लाख  शेतकऱ्यांचा लॅन्ड डेटा अपडेट! 1.12 लाख जणांचे ई-केवायसी पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 216 शेतकऱ्यांचा समावेश झाला असून, यासंदर्भातील लॅन्ड डेटा ऑनलाईन अपलोड करण्याचे तसेच ई-केवायसी कार्यवाही पूर्ण करण्याचे काम रायगड महसूल विभागाने पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  ऐन गणेशोत्सवाच्या काळातही कोणतीही सुट्टी न घेता या  हे काम  पूर्ण केले.

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9 सप्टेंबरपर्यंत रायगड जिल्ह्यात लॅन्ड डेटा अपलोड झालेल्या नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 74 हजार 216, एकूण आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 36 हजार 155, प्रमाणीकरणानंतर स्वीकृत झालेल्या एकूण अभिलेख्यांची संख्या:- 1 लाख 49 हजार 476, प्रमाणीकरण झाल्यानंतर स्वीकृत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या:- 1 लाख 5 हजार 373 अशी आहे. योजनेंतर्गत आज अखेर  जिल्ह्यात ई-केवायसी कार्यवाहीत आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांची संख्या- 1 लाख 36 हजार 155 इतकी आहे. तर ई-केवायसी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 12 हजार 976 (82.98%) यापैकी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत 75 हजार 957 (55.79%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप 23 हजार 179 (17.02%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे बाकी आहे. तर 31 हजार 711 (23.29%) लाभार्थी अपात्र ठरले आहे.

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्यांच्या कालावधीत 2 हजार रुपये दिले जातात. त्यानुसार वर्षाला एकूण 6 हजार रुपये अनुदान स्वरूपात बँक खात्यावर जमा करण्यात येतात. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड करताना शासनाने काही नियम-अटी ठरवून दिल्या आहेत. त्यानुषंगाने प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याची माहिती अपडेट करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले त्यासाठी ७ सप्टेंबर अंतिम मुदत होती.

या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यानुसार या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून लाभार्थी शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित करून तो ऑनलाईन अपलोड करण्याची कार्यवाही काही दिवसांतच यशस्वीरित्या पार पाडली.जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, तहसिलदार सचिन शेजाळ, सर्व नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर महसूल कर्मचाऱ्यांनी  हे काम पूर्ण केले.

ही माहिती आहे संकलित:- जमिनीचे क्षेत्र, बँक खाते क्रमांक, डाटा क्रमांक, खात्याचा प्रकार, फेरफारचा प्रकार अशा प्रकारची माहिती जमा करून  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम करण्यात आले.
 

Web Title: land data update of 1 74 lakh farmers under pm kisan samman scheme in raigad district complete e kyc of 1.12 lakh people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग