चोळई येथे दरड कोसळली; प्रशासनाकडून 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:07 PM2022-07-04T19:07:27+5:302022-07-04T19:07:50+5:30

चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग पावसामुळे खाली कोसळला.

land slide near Cholai on Mumbai Goa Highway; The administration evacuated 75 villagers | चोळई येथे दरड कोसळली; प्रशासनाकडून 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

चोळई येथे दरड कोसळली; प्रशासनाकडून 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

googlenewsNext

आज सकाळपासूनच सुरू असणाऱ्या धुंवाधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई  येथे दरड कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील 20 कुटुंबांतील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्या मंदिर पोलादपूर येथे हलविले आहे.

     सदर ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग पावसामुळे खाली कोसळला. दरडीचे ढिगारेच्या ढिगारे खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले. यामुळे तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.



 

    यावेळी नायब तहसीलदार समीर देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, नरवीर रेस्क्यू टीमचे पदाधिकारी रामदास कळंबे, दीपक उतेकर यासह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: land slide near Cholai on Mumbai Goa Highway; The administration evacuated 75 villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.