महानवाडीत दरड कोसळल्याने नुकसान, आठ शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:13 AM2019-08-14T02:13:34+5:302019-08-14T02:13:56+5:30

आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगराचा मोठा भाग शेतकऱ्यांच्या शेतात कोसळला आहे.

landslide in Mahanwadi | महानवाडीत दरड कोसळल्याने नुकसान, आठ शेतकऱ्यांना फटका

महानवाडीत दरड कोसळल्याने नुकसान, आठ शेतकऱ्यांना फटका

googlenewsNext

अलिबाग : आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगराचा मोठा भाग शेतकऱ्यांच्या शेतात कोसळला आहे. त्यामुळे सुमारे आठ शेतकºयांचे नुकसान झाले आहे. आठ दिवस उलटले तरी प्रशासन तेथे पोहोचले नसल्याने स्थानिक पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी गेले कु ठे?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाला याबाबत सूचित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे; परंतु तलाठी आणि ग्रामसेवक तेथे पोहोचले नसले तरी कृषी विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले होते, असा दावा अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी के ला आहे.

आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे डोंगर, दरड कोसळले होते. अलिबाग तालुक्यात खानाव येथे वेलटवाडी येथे डोंगर कोसळल्याने येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्याच वेळी अलिबाग-रोहा रस्त्यापासून पाच किलोमीटरवर असलेल्या महान आदिवासीवाडीवरही डोंगर कोसळला होता. त्यामुळे डोंगराच्या मातीचा ढिगारा हा खाली येऊन शेतकºयांच्या शेतात पडला. भाया लेंडी, भाग्या लेंडी, जानू काष्टी यांच्यासह अन्य पाच जणांच्या शेतात हा ढिगारा कोसळला आहे.

डोंगराच्या मातीचा ढिगारा व झाडे-झुडपे शेतात वाहून आल्याने लावलेली शेती नष्ट झाली आहे. पिकत्या शेतात गुडघाभर माती साचल्याने लागवडीची जमीन नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात आपत्ती येऊनही महसूल विभागाचा एकही कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. दरम्यान, या बाबतची माहिती मंगळवारी मिळाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आता तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.

Web Title: landslide in Mahanwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.