मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 06:23 AM2023-07-20T06:23:31+5:302023-07-20T09:08:36+5:30
Raigad Irshalwadi Landslide Incident - मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
रायगड - जिल्ह्यातील खालापूर तहसील क्षेत्रातील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफची दोन पथके मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत. गावातील या भूसख्खलनात १०० हून अधिकजण मलब्याखाली आल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आत्तापर्यंत २२ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दरम्यान, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंत माहिती हाती आली आहे.
या भूस्खलन दुर्घटनेत चार जण मृत्यूमुखी पडले आहेत. गावची लोकसंख्या २३४ असून १०० जण अडकल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. पाऊस सुरू असल्याने मदत मिळण्यास अडचण येत आहे. अडीच किलोमीटर वर ही वाडी आहे. शासनाने हेलिकॉप्टर ने शोध करावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. एनडीआरएफ, पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास १०० जणांची टीम घटनास्थळी दाखल असून मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, मुंबईहूनही एनडीआरएफच्या आणखी दोन टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
#UPDATE | So far, we have rescued 22 people. Several people are still feared trapped. Presently over 100 officials of Police and District administration are involved in rescue operations. We are getting help from NDRF, locals and some NGOs: Raigad Police
— ANI (@ANI) July 20, 2023
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. त्यातच मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, एनडीआरएफ जवानांशी संवादही साधला.
Maharashtra Ministers Uday Samant and Dada Bhuse reached Khalapur's Irshalwadi in Raigad district where a landslide took place late at night. NDRS and Raigad Police carry out rescue operations. pic.twitter.com/8LKIHbINMO
— ANI (@ANI) July 20, 2023