शालेय पोषण आहारात लेंड्या

By admin | Published: September 11, 2015 11:41 PM2015-09-11T23:41:34+5:302015-09-11T23:41:34+5:30

विद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक

Landy in school nutrition | शालेय पोषण आहारात लेंड्या

शालेय पोषण आहारात लेंड्या

Next

- अमोल जंगम,  म्हसळा
विद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारकडून दिले जात आहे. मात्र सरकारकडून शाळांना दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडत आहे. म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये शुक्रवारी पोषण आहार आला. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी पोषण आहाराची पाहणी केली असता तांदळाच्या बोरीमध्ये उंदरांच्या लेंड्या, दगड व माती आढळून आली. त्याचबरोबर तांदळाच्या बोरीचे वजन केले असता वजन देखील पोहच पावतीवर नमूद असल्यापेक्षा कमी प्रमाणात आढळून आले.
पन्नास किलोच्या बोरीमध्ये ४७ ते ४८ किलो धान्यच भरत होते. डाळ, तेल हे देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र स्टेट को-आॅप कन्झुमर फेडरेशन मुंबई यांच्याकडून हे धान्य जिल्ह्यातील वितरक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या येथे येते, तेथून ते धान्य महाड येथील वितरक महामुणकर यांच्याकडे आल्यानंतर धान्य कोंढे येथील
कासरुंग या सब वितरकाकडे येते. तेथून ते धान्य म्हसळा व श्रीवर्धनमधील शाळांमध्ये वितरण केले जाते.
जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा मिळून एकूण ३,२५९ शाळांना पोषण आहार वितरीत केला जातो. एका शाळेच्या पोषण आहारामध्ये २० ते २५ किलोची घट मिळत असली तर या यंत्रणेमध्ये दर महिन्याला लाखो
रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकारी व वितरकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्व वितरकांचे परवाने रद्द करण्याची मागणी देखील केली आहे.
म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आला आहे हे समजताच शालेय समितीचे सदस्य बाबू बनकर यांनी तिथे येऊन पोषण आहाराचा गट शिक्षण अधिकारी जळगावकर व केंद्र प्रमुख धामणकर यांच्या समक्ष पंचनामा करून नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

50 किलोच्या बोरीमध्ये ४७ ते ४८ किलो धान्यच भरत होते. डाळ, तेल हे देखील निकृष्ट दर्जाचे आढळून आले. तर तेलाच्या पाकीटचे पॅकिंग घरी बसून बनवले असल्याचे निदर्शनास येत आहे.

शालेय पोषण आहारासाठी आलेले धान्य निकृष्ट होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हसळा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मालुसरे यांनी सांगितले.

3259 शाळांना पोषण आहार वितरीत केला जातो. एका शाळेच्या पोषण आहारमध्ये २० ते २५ किलोची घट मिळत असली तर या यंत्रणेमध्ये लाखो रु पयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Landy in school nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.