शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

शालेय पोषण आहारात लेंड्या

By admin | Published: September 11, 2015 11:41 PM

विद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक

- अमोल जंगम,  म्हसळाविद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारकडून दिले जात आहे. मात्र सरकारकडून शाळांना दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडत आहे. म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये शुक्रवारी पोषण आहार आला. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी पोषण आहाराची पाहणी केली असता तांदळाच्या बोरीमध्ये उंदरांच्या लेंड्या, दगड व माती आढळून आली. त्याचबरोबर तांदळाच्या बोरीचे वजन केले असता वजन देखील पोहच पावतीवर नमूद असल्यापेक्षा कमी प्रमाणात आढळून आले.पन्नास किलोच्या बोरीमध्ये ४७ ते ४८ किलो धान्यच भरत होते. डाळ, तेल हे देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र स्टेट को-आॅप कन्झुमर फेडरेशन मुंबई यांच्याकडून हे धान्य जिल्ह्यातील वितरक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या येथे येते, तेथून ते धान्य महाड येथील वितरक महामुणकर यांच्याकडे आल्यानंतर धान्य कोंढे येथील कासरुंग या सब वितरकाकडे येते. तेथून ते धान्य म्हसळा व श्रीवर्धनमधील शाळांमध्ये वितरण केले जाते.जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा मिळून एकूण ३,२५९ शाळांना पोषण आहार वितरीत केला जातो. एका शाळेच्या पोषण आहारामध्ये २० ते २५ किलोची घट मिळत असली तर या यंत्रणेमध्ये दर महिन्याला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकारी व वितरकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्व वितरकांचे परवाने रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आला आहे हे समजताच शालेय समितीचे सदस्य बाबू बनकर यांनी तिथे येऊन पोषण आहाराचा गट शिक्षण अधिकारी जळगावकर व केंद्र प्रमुख धामणकर यांच्या समक्ष पंचनामा करून नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. 50 किलोच्या बोरीमध्ये ४७ ते ४८ किलो धान्यच भरत होते. डाळ, तेल हे देखील निकृष्ट दर्जाचे आढळून आले. तर तेलाच्या पाकीटचे पॅकिंग घरी बसून बनवले असल्याचे निदर्शनास येत आहे. शालेय पोषण आहारासाठी आलेले धान्य निकृष्ट होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हसळा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मालुसरे यांनी सांगितले.3259 शाळांना पोषण आहार वितरीत केला जातो. एका शाळेच्या पोषण आहारमध्ये २० ते २५ किलोची घट मिळत असली तर या यंत्रणेमध्ये लाखो रु पयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे.