विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहीर) पूर्णपणे मोडली आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाण्याचा अपव्यय होत असून, धरण रिते झाले आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील दुरुस्तीची कामे संबंधितांनी करावी, अशी मागणी होत आहे.लघू पाटबंधारे विभागामार्फत १९७२ मध्ये उन्हेरे धरणाचे बांधकाम झाले. धरणाचे सिंचन क्षेत्र १४२ हेक्टर आहे. मात्र, ज्या उद्देशाने या धरणाची निर्मिती झाली त्या सिंचनासाठी पाण्याचा वापर होत नाही. मागील अडीच वर्षांपूर्वी जॅकवेल मोडकळीस आली होती. त्यामुळे धरणातून पाणी वाया जात होते. त्या वेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी करुन लवकरच विहीर व गेटची दुरु स्ती करणार असल्याचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा (पाटबंधारे) विभाग कोलाड यांनी सांगितले होते. मात्र, आजतागायत यासंदर्भात कोणतीच उपाययोजना झाली नाही. सध्या ही जॅकवेल पूर्णपणे तुटली आहे.>बेकायदा रेती उत्खननावर कारवाईहे धरण कोरडे होत असल्यामुळे येथे रेतीमाफिया सक्रिय झाले होते. मात्र, उन्हेरे धरण क्षेत्रातील बेकायदा रेती उत्खननावर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे. सहा ब्रास रेती जप्त केली असून धरण क्षेत्रात जाणारा रस्ता वाहनांकरिता पूर्णपणे बंद केला आहे, त्यामुळे येथील रेती उत्खनन आता बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त के ले. मात्र, इतरही अडचणी लक्षात घेऊन येथे योग्य त्या दुरुस्ती कराव्यात, अशी मागणी करीत आहे.तर येत्या काही दिवसांत येथे रेती उत्खननाबाबतची अधिक कारवाई देखील नियोजित असल्याचे तहसीलदार दिलीप रैनावार यांनी सांगितले.>हे केल्यास होईल फायदाधरणाची व कालव्याची दुरु स्ती केल्यास सभोवतालचा परिसर सिंचनाखाली येऊ शकतो. आजूबाजूच्या परिसरातील शेतीला, नद्यांना व विहिरींना मुबलक पाणी मिळेल. गाळ काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल.>धरण क्षेत्रातील समस्याधरणाची जॅकवेल पूर्णपणे तुटली आहे.धरणातील पाणीगळती लागून बाहेर वाया जात आहे.धरणाच्या बांधांवर झाडी वाढली आहे.धरण मद्यपींचा अड्डा बनले आहे.धरण गाळाने भरले आहे.>डिझाईन डिव्हिजनकडून डिझाईन मिळाले नव्हते त्यामुळे धरणाचे काम करता येत नव्हते. आता ते डिझाईन मिळाले आहे. त्यामुळे निविदा मागविण्यासाठीची प्रक्रि या पूर्ण झाली आहे. धरणाच्या दुरु स्ती कामाची निविदा मागविली जाणार आहे. त्यानंतर धरणाच्या दुरु स्तीचे काम पूर्ण केले जाईल.- आर. के. सुपे, शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग कोलाड.अधिकाधिक लोकांनी सिंचनासाठी पाणी वापरणे गरजेचे आहे. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे धरणाची वेळीच दुरु स्ती करणे गरजेचे आहे, अन्यथा आमच्या पंचक्र ोशीला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.- शिवमूर्ती पवार,पोलीस पाटील, उन्हेरे
उन्हेरे धरण मोजतेय अखेरची घटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 11:52 PM