माथेरान रेल्वे दुरु स्तीचे काम अंतिम टप्प्यात!, मिनीट्रेन लवकरच येणार रु ळावर, स्थानिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:53 AM2017-09-11T06:53:11+5:302017-09-11T06:53:26+5:30

माथेरान मिनीट्रेन रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच मिनीट्रेन स्थानिकांसह पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. माथेरानला १९०७ साली मिनीट्रेन सेवा सर आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सुरू करून रेल्वे प्रशासनाला जनतेच्या सेवेसाठी बहाल केली. या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मिनीट्रेनमुळे पर्यटन वाढल्याने स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाले आहेत; परंतु गतवर्षी तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती.

 In the last phase of Matheran Railway repair work, the mintrain will soon come, the residents will get relief | माथेरान रेल्वे दुरु स्तीचे काम अंतिम टप्प्यात!, मिनीट्रेन लवकरच येणार रु ळावर, स्थानिकांना दिलासा

माथेरान रेल्वे दुरु स्तीचे काम अंतिम टप्प्यात!, मिनीट्रेन लवकरच येणार रु ळावर, स्थानिकांना दिलासा

googlenewsNext

- मुकुंद रांजणे  
माथेरान : माथेरान मिनीट्रेन रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच मिनीट्रेन स्थानिकांसह पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
माथेरानला १९०७ साली मिनीट्रेन सेवा सर आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सुरू करून रेल्वे प्रशासनाला जनतेच्या सेवेसाठी बहाल केली. या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मिनीट्रेनमुळे पर्यटन वाढल्याने स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाले आहेत; परंतु गतवर्षी तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत, शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर यांनीसुद्धा प्रत्यक्ष रेल्वेमंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले होते. एक सदस्य समितीचे जनार्दन पार्टे यांसह स्थानिक पातळीवर कामे करणाºया विविध संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनीसुद्धा लेखी निवेदन संबंधित अधिकारी वर्गाला दिलेली आहेत. त्यानुसार रेल्वेचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे.
आॅक्टोबर महिन्यात ही रेल्वे सेवा सुरळीत सुरू होईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे. माथेरानची राणी लवकरच पुन्हा रु ळावर येणार असल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

खासदार बारणे यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा
१माथेरानच्या मिनीट्रेनला बंद होऊन वर्षपूर्ती झाली असून, त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनियुक्त केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची बुधवार, ६ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे भेट घेऊन नेरळ-माथेरान ही नरॉगेज ट्रेन लवकरच सुरू करावी, अशी मागणी केली.
२माथेरानच्या मिनीट्रेनची बोगी ८ मे २०१६ रोजी एका जागीच दोनदा घसरल्याने रेल्वेच्या अधिकाºयांनी ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आगामी सुट्ट्यांचा हंगाम जवळ येत असल्याने नेरळ-माथेरान ट्रेन लवकरात लवकर सुरू करून पर्यटकांच्या सेवेसाठी तत्परता दर्शवावी, असेही बारणे यांनी नवनियुक्त केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे स्पष्ट केले.

मिनीट्रेन ही माथेरानकरांसह पर्यटकांचा श्वास बनलेली आहे. याबाबत वारंवार सरकार दरबारी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह भेटी घेतलेल्या आहेत. एकंदरच रेल्वेच्या दुरु स्तीची कामे युद्धपातळींवर सुरू असल्याने अल्पावधीतच ही सेवा सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
- प्रसाद सावंत, विद्यमान नगरसेवक माथेरान नगरपालिका

ट्रेन बंद असल्यामुळे दस्तुरीपासूनची तीन किलोमीटर पायपीट करून केवळ माथेरानला यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यात यावी.
- नीलकंठ मंडलिक, पर्यटक, मुंबई
 

Web Title:  In the last phase of Matheran Railway repair work, the mintrain will soon come, the residents will get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.