सुवर्ण गणेश मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:47 AM2018-03-23T02:47:29+5:302018-03-23T02:47:29+5:30

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये निधी खर्चून सुरू केलेले बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे.

 In the last phase of the work of Golden Temple Ganesh temple | सुवर्ण गणेश मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

सुवर्ण गणेश मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

googlenewsNext

बोर्ली पंचतन : संपूर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये निधी खर्चून सुरू केलेले बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने काम प्रगतिपथावर आहे, तसेच सध्या गणेश मंदिरातील असलेल्या पुरातन शिवकालीन गणेशाच्या मूर्तीवर वज्रलेप आणि मूर्तीची पुनर्स्थापना कार्यक्र म २४ ते २६ मार्चअखेर करण्यात येणार असून मंदिराच्या कलशारोहण देखील यावेळी श्री गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेशाच्या मुखवट्याचे सोने लवकरच शासनाकडून गणपती ट्रस्टकडे मिळणार असून या सोन्याची नवीन मूर्ती घडवून सुवर्ण गणेशाचे देखील पुढील कालावधीत पुनर्स्थापना होईल, असा विश्वास ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर यांनी व्यक्त केला.
दिवेआगर सुवर्ण गणेशमंदिरातील मूळ गणेश मूर्ती पुरातन असून यापूर्वी या मूर्तीची प्रतिष्ठापना अंदाजे १८६५ सालादरम्यान करण्यात आली होती. तिथपासून या मूर्तीवर अभिषेक व पूजा केल्याने शेंदुराचे थर चढले होते यासाठी या मूर्तीवर शास्त्रोक्त पद्धतीने संस्कार करून या मूर्तीवर वज्रलेप व त्याच मूर्तीची पुनर्स्थापना करण्याचा कार्यक्र म २४ ते २६ मार्चअखेर करण्यात येणार आहे. मूर्तीच्या सिंहासनाचे काम सुरू असल्याने मंदिर दर्शनासाठी १९ ते २६ मार्चअखेर बंद ठेवण्यात आले आहे. शनिवार २४ मार्च रोजी सकाळी १० वा. उदकशांती, ५ वा. होमहवन, रविवार २५ मार्च रोजी सकाळी ८ वा. शांतीहोम, सकाळी १०वा. वास्तुशांती व जलाधिवास, दुपारी ४ वा. कळस मिरवणूक, सोमवार २६ मार्च रोजी सकाळी ९वा. कलशारोहण, सकाळी ११ वा.मूर्ती पुनर्स्थापना व त्यानंतर महाआरती व प्रसाद असे कार्यक्र म होणार आहेत.

१सुवर्ण गणेश मंदिराचे बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. २०१४ पासून हे बांधकाम सुरू असून मंदिराच्या आतील गाभाऱ्याचे काही प्रमाणात तसेच वीज जोडणी, सीसीटीव्ही कॅमेरा व मंदिराची रंगरंगोटी अशी कामे शिल्लक आहेत.
२या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्णत्वास येणार असल्याचे चित्र आहे. तसेच मंदिरातील सुवर्ण गणेशाच्या दरोड्यामध्ये चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचे सोने आता गणपती देव आणि पूजेची नेमणूक ट्रस्ट यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहखात्याकडून चौकशी पूर्ण झाली आहे. लवकरच सोने ट्रस्टकडे देण्याबाबत शासन अनुकूल असल्याची माहिती गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर यांनी दिली.
३त्यादृष्टीने सोने ट्रस्टच्या ताब्यात मिळाल्यानंतर लगेचच सुवर्ण गणेशाची पुनर्स्थापना देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निश्चितपणे दिवेआगर पर्यायाने श्रीवर्धन पर्यटनाच्या बाबत उंच भरारी घेईल असा विश्वास पिळणकर यांनी व्यक्त केला.
४सुवर्ण गणेशमूर्ती श्री गणपती देव आणि पूजेची नेमणूक ट्रस्ट यांच्या अधिपत्याखाली देखभाल करण्यात येत असे व आता आॅगस्ट २०१७ पासून नव्याने कार्यभार हाती घेतलेल्या ट्रस्टचे काम ग्रामस्थांच्या सहकार्यातून समाधानकारक सुरू असल्याने समस्त दिवेआगर सहित श्रीवर्धनकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title:  In the last phase of the work of Golden Temple Ganesh temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड