पनवेल पालिकेच्या ताफ्यात अद्ययावत रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन

By वैभव गायकर | Published: March 15, 2023 06:47 PM2023-03-15T18:47:06+5:302023-03-15T18:48:39+5:30

सांडपाण्याच्या विशिष्ट गुरुत्वाकर्षणावर अवलंबून व्हॅक्यूम तयार करुन अंदाजे ६ ते ८ मीटरच्या चेंबर सांडपाणी, द्रव स्लरी, गाळ आणि इतर साहित्य बाहेर काढण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे.

Latest Recycler Sewer Sanction cum Jetting Machine in fleet of Panvel Corporation | पनवेल पालिकेच्या ताफ्यात अद्ययावत रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन

पनवेल पालिकेच्या ताफ्यात अद्ययावत रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन

googlenewsNext

पनवेल - महानगरपालिकेच्या ताफ्यात अद्ययावत मलनिस्सारण जेटिंग मशीन दाखल झाल्या आहेत.साफसफाई करण्यासाठी  10 हजार 500 लिटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन पालिकेने खरेदी केल्या आहेत. मलनिस्सारण विभागातील  ही सर्वांत अत्याधुनिक वाहने असून या वाहनांमुळे मलनिस्सारण वाहिन्यांची साफसफाई अधिक चांगल्या पध्दतीने करता येणार आहे.  

मलनिस्सारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी १०,५०० लिटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन १५० ते १२०० मी.मी. व्यासाच्या मलवाहिन्यांमध्ये असलेला अडकलेला गाळ( चोकअप )काढण्यास  ही वाहने सक्षम आहेत.या वाहनांमध्ये हायड्रॉलिक व्हॅक्यूम आणि हाय प्रेशर-हाय फ्लो वॉटर जेटिंग पंप व सुरक्षितता इत्यादी बाबी अंतर्भुत आहेत.हायड्रोडायनामिक क्लोनिंगच्या तत्त्वावर काम करणाऱ्या व हाय प्रेशर जेटिंग सिस्टीमद्वारे सीवर आणि ड्रेनजच्या पाण्याच्या लाईन्स आणि चेंबर्सचे डी-चॉकिंग आणि डी-सिल्टिंग योग्य प्रमाणात करणे, सीवर जेटिंग पाईप आणि विशेष नोजलने साफ करण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे.

सांडपाण्याच्या विशिष्ट गुरुत्वाकर्षणावर अवलंबून व्हॅक्यूम तयार करुन अंदाजे ६ ते ८ मीटरच्या चेंबर सांडपाणी, द्रव स्लरी, गाळ आणि इतर साहित्य बाहेर काढण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे. सदर वाहनाच्या टाकीतील जमा झालेल्या गाळाची विल्हेवाट इच्छित स्थळी नेऊन गुरुत्वाकर्षण, प्रेशर डिस्चार्ज द्वारे रिकामी केली जाणार आहे.  यामधील खराब पाण्यांवर पुर्नप्रक्रिया (रिसायकल) करण्याची व्यवस्था या वाहनांमध्ये अंर्तभूत आहे. यामुळे साफसफाईतून जमा होणारे पाणी पुन्हा वापरात येणार आहे.  त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली आहे.      

Web Title: Latest Recycler Sewer Sanction cum Jetting Machine in fleet of Panvel Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल