कशेळे ग्रामीण रुग्णालयात लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:31 AM2019-06-07T00:31:53+5:302019-06-07T00:32:00+5:30

कशेळे ग्रामीण रुग्णालय शासनाने आदिवासी लोकांसाठी उभे केले, त्या वेळी स्थानिक लोकांनी रुग्णालयाचा उपयोग गरीब लोकांना होणार म्हणून जमीन दिली आणि त्या जागेवर रुग्णालय उभे राहिले.

Launch booth at Kashele Rural Hospital | कशेळे ग्रामीण रुग्णालयात लूट सुरूच

कशेळे ग्रामीण रुग्णालयात लूट सुरूच

Next

नेरळ / कर्जत : कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचे आणि त्यातही आदिवासी लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उभारलेले कशेळे ग्रामीण रुग्णालय रुग्णांना सेवा देण्याऐवजी नाहक त्रास देताना दिसत आहे. रुग्ण तपासणी करण्यासाठी आल्यानंतर यांच्याकडून दहा रुपये आकारून केसपेपर बनतो. मात्र, कशेळे ग्रामीण रुग्णालय रुग्णांकडून चक्क ५० रुपये आकारत असून स्थानिक कार्यकर्त्यांनी रुग्णालय कोणासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

कशेळे ग्रामीण रुग्णालय शासनाने आदिवासी लोकांसाठी उभे केले, त्या वेळी स्थानिक लोकांनी रुग्णालयाचा उपयोग गरीब लोकांना होणार म्हणून जमीन दिली आणि त्या जागेवर रुग्णालय उभे राहिले. या रुग्णालयात कधी डॉक्टर नसतात तर कधी कर्मचारी नसतात. त्यामुळे स्थानिक लोक कशेळे ग्रामीण रुग्णालयाबाबत सातत्याने नाराजी व्यक्त करीत असतात. गेल्या काही वर्षांत कशेळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वेगवेगळ्या प्रकारे लूट केली जाते.

याबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक वेळा या बाबत प्रसारमाध्यमांतून आवाज उठवूनदेखील कोणी लक्ष देत नाही ही बाब दुर्दैवी आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही आदिवासी लोकांकडून रुग्णालयामध्ये केसपेपरची किंमत दहा रुपये आणि त्यांच्या व्यतिरिक्त ५० रुपये अधिक उकळले जात असल्याचे कशेळे येथील कार्यकर्ते उदय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

पाटील यांनी रुग्णालयात जाऊन ड्युटीवर असलेले डॉ. संजय धनगावे यांची भेट घेऊन या बाबत जाब विचारला.डॉ संजीव यांनी त्या ठिकाणी प्रतिरुग्ण ५० रुपये घेण्याचा सरकारचा आदेश आहे, असे सांगितले. आपल्या बोर्डवर असा काही उल्लेख नाही, असे उदय पाटील यांनी दाखवून दिल्यानंतर, लवकरच असा निर्णय होणार आहे, असे डॉ. संजीव यांनी सांगितले. त्यामुळे सरकारचा निर्णय होण्याआधी कशेळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांकडून ५० रुपये आकारले जात आहेत.

उदय पाटील यांचा फोन आला आणि त्यांनी फोन करून या बाबतची माहिती दिली असता त्यांनी संबंधित डॉक्टरला या पुढील रुग्णांकडून जास्त पैसे घेऊ नका, अशी सूचना केली आहे. काही वेळाने पाटील स्वत: रुग्णालयात आले असता, असा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती पाटील यांना दिली आहे. - डॉ. संजय धनगावे, अधीक्षक, कशेळे ग्रामीण रुग्णालय

Web Title: Launch booth at Kashele Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.