शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

रेवस बंदरातील लाँच सेवा ‘गाळा’त, प्रवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:06 AM

मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात.

- आविष्कार देसाईअलिबाग : मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात. मेरीटाइम बोर्डाने बंदरातील गाळ काढताना रेवस बंदराकडे दुर्लक्ष केल्याने येथील लाँच सेवेच्या वेळापत्रकावर आहोटीमुळे विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे या बंदरातून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मांडवा बंदरातून थेट गेट वे आॅफ इंडिया (मुंबई) अगदी कमी वेळेत जाता येते. काही वर्षांत बंदराचा झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी लाँच सेवा देणाºया संस्था उभ्या राहिल्या आहेत. आरामदायी प्रवासाबरोबरच सुरक्षित प्रवासामुळे या ठिकाणाहून प्रवासी बोटींच्या नियमित फेºया होत असतात. बोट सेवा देणाºया खासगी कंपन्यांना आणि मेरीटाइम बोर्डाला त्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. या बंदराची चांगल्या पद्धतीने देखभाल केली जाते. ओहोटीमुळे बोटसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी बंदरातील गाळ काढण्याचे काम नियमित केले जाते. २०१७-१८ या कालावधीत मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेजिंग प्रा. लि. कंपनीने एक लाख ७२ हजार ५५७ घनमीटर गाळ काढला होता, तर २०१८-१९ या कालावधीमध्ये दोन लाख ५१ हजार ५५२ घनमीटर गाळ मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेजिंग प्रा. लि. या खासगी कंपनीनेच काढला आहे. यासाठी अनुक्रमे सहा कोटी ७२ लाख ९७ हजार २३० आणि नऊ कोटी ८१ लाख पाच हजार २८० असा एकूण १६ कोटी ५४ लाख दोन हजार ५१० रुपये खर्च करण्यात आला आहे. मांडवा येथील बंदरातून मोठ्या प्रमाणात नियमित गाळ काढला जात असल्याचे दिसून येते.रेवसला सर्वसामान्य नागरिकांची पसंतीरेवस बंदरातून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करतात, तर मांडवा बंदरातून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे प्रवास करतात. या बंदरातील गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्ड चोखपणे बजावताना दिसते. मात्र, रेवस बंदराबाबत उदासीनता दिसून येते.रेवस बंदरातील गाळ वेळेवर काढला जात नसल्यामुळे सद्यस्थितीतील तेथील लाँच सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. रेवस बंदरावर मुंबई जलवाहतूक व औद्योगिक संस्थेच्या सूचनाफलकाखाली २२ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबरपर्यंत ओहोटीच्या समस्येमुळे बदललेले वेळापत्रक लिहिले आहे. या वेळापत्रकामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक कोलमडले आहे.ओहोटीच्या वेळी प्रवासात अडचणीरेवस बंदरातून मुंबई आणि करंजा असा जलप्रवास सुरू असतो. १ जून ते ३१ सप्टेंबरपर्यंत रेवस-मुंबई जलप्रवास पावसाळी हंगामामुळे बंद ठेवण्यात येतो. तर करंजा ते रेवस हा जलप्रवास कमी अंतराचा असल्याने वर्षाचे बाराही महिने सुरू असतो. रेवस आणि करंजा बंदरात गाळाची समस्या असल्याने संकष्टी चतुर्थीसह अन्य तिथीला ओहोटीच्या वेळी प्रवासात फार मोठा अडथळा निर्माण होतो. महिनाभर मेरीटाइम बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली रेवस बंदरात गाळ काढण्याचे काम सुरू आहे; पण गाळाची समस्या कायमस्वरूपी सुटत नाही.मांडवा बंदरातील गाळ काढण्याकरिता खासगी ठेकेदारासाठी सुमारे साडेसोळा कोटी रुपये सरकारने उधळले आहेत. त्याची चौकशीची मागणी राज्याच्या गृहविभागाकडे केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मांडवा बंदरातून प्रवास करणारे हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य प्रवास करतात. त्यामुळे मेरीटाइम बोर्ड या बंदराकडे दुर्लक्ष करत आहे. मेरीटाइम बोर्डाने हा दुजाभाव बंद करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.११ हजार २५० घनमीटर गाळ काढलारेवस बंदराचा विचार केल्यास एप्रिल-मार्च २०१७ त्यानंतर १५ आॅक्टोबर २०१८ पासून आतापर्यंत सुमारे ११ हजार २५० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. रेवस बंदरातील गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्डाकडून सुरू आहे, अशी माहिती मेरीटाइम बंदराचे बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी ‘लोकमत’ला दिली.मांडवा बंदरातून होणाºया प्रवासी वाहतुकीसाठी चांगल्या दर्जाच्या लाँच प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. लाँच सेवेचे तिकीटदर १५० रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहेत, तर रेवस ते भाऊचा धक्का (मुंबई) सुमारे ८० रुपये तिकीटदर आहे. हा दर मांडव्यापेक्षा खूपच कमी असल्याने सर्वसामान्य येथून मुंबईला जाणे पसंत करतात आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना ते परवडणारे आहे.

टॅग्स :Raigadरायगड