शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

रायगड जिल्ह्यात सर्वत्र लक्ष्मीपूजन उत्साहात, व्यापाऱ्यांनी केले चोपडीपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:32 AM

आश्विन अमावास्या अर्थात लक्ष्मीपूजनाचा दिवस व्यावसायिक आणि घरोघरीदेखील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा सोहळा उत्साहात होताना दिसून आला.

विशेष प्रतिनिधीअलिबाग  - आश्विन अमावास्या अर्थात लक्ष्मीपूजनाचा दिवस व्यावसायिक आणि घरोघरीदेखील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा सोहळा उत्साहात होताना दिसून आला. सुवर्णकार, सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या पेढ्या, व्यावसायिक त्याचबरोबर सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये लक्ष्मीपूजन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.चौरंग वा पाटावर कुंकुम अक्षतांच्या साहाय्याने आठ पाकळ्यांचे कमळ काढून त्यावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर या देवतांची पूजा करण्यात आली. सुखसमृद्धी आणि आर्थिक वृद्धीकरिता मनोभावे प्रार्थना करून लवंग, वेलची, साखरयुक्त गाईच्या दुधापासून केलेल्या मिठायांबरोबरच धणे, गूळ, साळीच्या लाह्या, फळे, बत्तासे अशा विविध पदार्थांचाही नैवेद्य दाखविण्यात आला.अमावास्येमुळे संपूर्ण जगामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते; परंतु पणत्या आणि विविध दिव्यांच्या प्रकाशात तो अंधार दूर केला जातो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय-’ अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रगतीकडे, आशेकडे, यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा या आश्विन अमावास्येच्या रात्री लखलखणाºया असंख्य पणत्यांकडून मिळत असते. लक्ष्मीपूजनासारख्या धार्मिक विधींचे प्रत्येक जण आपापल्या परीने भक्तिपूर्वक पूजन करतो.व्यापारी पूजेनंतर पुढील वर्षाच्या जमाखर्चाच्या वह्यांची पूजादेखील याच दिवशी करतात. या परंपरेस अनुसरून अलिबाग, पोयनाड, महाड, रोहा, माणगांव, पेण येथील मोठ्या व्यापाºयांनी संध्याकाळी मुहूर्तावर ‘चोपडीपूजन’ केले. वर्षभरातील अमावास्या कुठल्याही शुभकार्यासाठी अयोग्य मानल्या जातात. मात्र, आश्विन अमावास्या त्यास केवळ अपवादच असते. ही अमावास्या सर्वाधिक पवित्र आणि आर्थिकदृष्ट्या लाभकारी मानली जाते.रेवदंड्यात बाजारपेठेत रोषणाईलक्ष्मीपूजन सायंकाळी ४.३० ते रात्री ११ च्या सुमारास असल्याने व्यापारीवर्गाप्रमाणे घरोघरी लक्ष्मीचा फोटो, नवीन वहीवर स्वस्तिक काढून पूजनासाठी तयारी चालू होती. सकाळपासूनच पुरोहितवर्गाकडे अनेक व्यावसायिक पूजनाचा मुहूर्त ठरवण्यासाठी आलेले दिसत होते.सायंकाळी बाजारपेठेत दिव्यांची रोषणाईने सजली होती. काही व्यापारी मात्र वही (चोपडी)पूजन ऐवजी आधुनिक लॅपटॉप किंवा संगणकाची पूजा करताना दिसत होते. काही ठिकाणी धणे-गुळाचा नैवेद्य दाखवला जात होता, तर काही ठिकाणी बतासे प्रसादात होते.

टॅग्स :Raigadरायगड