कोशिंबळे तर्फे निजामपूर बंधाऱ्याला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:47 AM2019-04-06T04:47:56+5:302019-04-06T04:48:25+5:30
तीन वेळा दुरुस्ती : लाखो रुपये खर्चूनही दुरवस्था; पाणीटंचाई
गिरीश गोरेगावकर
माणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील कोशिंबळे तर्फे निजामपूर येथील बंधारा हा १९७२ मध्ये बांधण्यात आला होता. त्याची तीन वेळा दुरुस्ती देखील करण्यात आली होती. सर्वात मोठी दुरुस्ती २०१५-१६ मध्ये सुमारे ७३ लाख रु पये खर्चून करण्यात आली होती. मात्र, आज या बंधाऱ्याची स्थिती बिकट झाली असून गळती सुरू आहे.यामुळे पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
बंधाºयाची २०१५-१६ मध्ये लघुपाटबंधारे खात्याकडून दुरुस्ती करण्यात आली होती; परंतु ही दुरुस्ती नीट न झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये पुन्हा दुरवस्था झाली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून देखील बंधाºयामध्ये पाण्याचा साठा खूप कमी झाला. पुढील काही दिवसात हे धरण कोरडे पडणार असून या भागात पाणीटंचाई होणार आहे. या विभागात मार्च महिन्यापासूनच पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या बंधाºयाला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पाण्याचा साठाच होत नाही. ते पाणी वाहून निघून जात आहे.
बंधाºयाच्या कामासाठी केलेला भराव आजही या नदीच्या पात्रात शिल्लक आहे. तसेच बंधाºयावरील सिमेंट काँक्रीट वाहून गेल्याने आतील स्टील बाहेर आले आहे. या बंधाºयामुळे निजामपूर, कोस्ते बुद्रुक, कोशिंंबळे,खर्डी,चव्हाण वाडी या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हायचा; परंतु ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
च्कोशिंबळे धरण बंधारा हा लघुपाटबंधारेकडून बांधला गेला असून त्याची दुरुस्ती २०१५-१६ मध्ये त्यांच्याकडूनच झाली असून २०१७ मध्ये हे धरण रायगड पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
कोशिंबळे धरण बंधारा आधी लघुपाटबंधारे विभागाकडे होता, तो २०१७-१८मध्ये रायगड पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द के ला.या बंधाºयाला गळती लागली असून त्या कामाची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंजुरीकरिता दिला आहे.
- श्वेता पाटील, सहायक
कार्यकारी अभियंता, माणगाव