शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कोशिंबळे तर्फे निजामपूर बंधाऱ्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 4:47 AM

तीन वेळा दुरुस्ती : लाखो रुपये खर्चूनही दुरवस्था; पाणीटंचाई

गिरीश गोरेगावकरमाणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील कोशिंबळे तर्फे निजामपूर येथील बंधारा हा १९७२ मध्ये बांधण्यात आला होता. त्याची तीन वेळा दुरुस्ती देखील करण्यात आली होती. सर्वात मोठी दुरुस्ती २०१५-१६ मध्ये सुमारे ७३ लाख रु पये खर्चून करण्यात आली होती. मात्र, आज या बंधाऱ्याची स्थिती बिकट झाली असून गळती सुरू आहे.यामुळे पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.

बंधाºयाची २०१५-१६ मध्ये लघुपाटबंधारे खात्याकडून दुरुस्ती करण्यात आली होती; परंतु ही दुरुस्ती नीट न झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये पुन्हा दुरवस्था झाली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून देखील बंधाºयामध्ये पाण्याचा साठा खूप कमी झाला. पुढील काही दिवसात हे धरण कोरडे पडणार असून या भागात पाणीटंचाई होणार आहे. या विभागात मार्च महिन्यापासूनच पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या बंधाºयाला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पाण्याचा साठाच होत नाही. ते पाणी वाहून निघून जात आहे.बंधाºयाच्या कामासाठी केलेला भराव आजही या नदीच्या पात्रात शिल्लक आहे. तसेच बंधाºयावरील सिमेंट काँक्रीट वाहून गेल्याने आतील स्टील बाहेर आले आहे. या बंधाºयामुळे निजामपूर, कोस्ते बुद्रुक, कोशिंंबळे,खर्डी,चव्हाण वाडी या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हायचा; परंतु ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.च्कोशिंबळे धरण बंधारा हा लघुपाटबंधारेकडून बांधला गेला असून त्याची दुरुस्ती २०१५-१६ मध्ये त्यांच्याकडूनच झाली असून २०१७ मध्ये हे धरण रायगड पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.कोशिंबळे धरण बंधारा आधी लघुपाटबंधारे विभागाकडे होता, तो २०१७-१८मध्ये रायगड पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द के ला.या बंधाºयाला गळती लागली असून त्या कामाची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंजुरीकरिता दिला आहे.- श्वेता पाटील, सहायककार्यकारी अभियंता, माणगाव 

टॅग्स :Waterपाणीraigad-pcरायगड