सांडपाणी वाहिनीचे काम रखडल्याने गळती; महाड एमआयडीसीतील  कंपन्या १२ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 02:52 AM2021-01-29T02:52:39+5:302021-01-29T02:52:56+5:30

मोठे नुकसान, महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी महाडमधील सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणून प्रक्रिया केले जाते.

Leakage due to obstruction of sewer work; Companies in Mahad MIDC closed for 12 days | सांडपाणी वाहिनीचे काम रखडल्याने गळती; महाड एमआयडीसीतील  कंपन्या १२ दिवस बंद

सांडपाणी वाहिनीचे काम रखडल्याने गळती; महाड एमआयडीसीतील  कंपन्या १२ दिवस बंद

Next

दासगाव : महाड एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी ज्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून खाडीत सोडले जाते, त्या सांडपाणी वाहिनीचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. या रखडलेल्या कामामुळे जुनी पाइपलाइन लिकेज होऊन नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या जवळपास १२ दिवस बंद ठेवण्यात आल्याने कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होत.

महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी महाडमधील सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणून प्रक्रिया केले जाते. सीईटीपीमधून प्रक्रिया केलेले सांडपाणी महाड खाडीपट्ट्यामधील ओवळे गावात खाडीमध्ये सोडले जाते. १९९६-९७ मध्ये पीएससी मटेरियलमधील ही पाइपलाइन आता जीर्ण झाली आहे. यामुळे ही पाइपलाइन सातत्याने लिकेज होत असल्याने परिसरातील शेतीचे आणि नदीचे नुकसान होत आहे. सातत्याने होत असलेल्या या नुकसानीबाबत शासन दरबारी कायम आवाज उठवला गेल्याने २०१७ मध्ये या पाइपलाइनच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. २४ एमएलडी क्षमतेची जुनी पाइपलाइन आहे. आता नव्याने एवढ्या क्षमतेच्या पाइपलाइनचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पाइपलाइनचे ओवळेपासून पुढे दोन किमी अंतर खाडीमध्ये काम केले जाणार असल्याचे सहायक अभियंता ए. ए. अल्हाट यांनी सांगितले.

अनेकवेळा जलवाहिनी बंद 
सुधारित प्रस्तावाला अद्याप निधी मंजूर झाला नसल्याने हे काम रखडले आहे. यामुळे जीर्ण झालेल्या पाइपलाइनमधूनच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सांडपाणी ओवळे येथे नेले जात आहे. या पाइपलाइनमध्ये अनेकवेळा बिघाड होत असल्याने गेल्या दोन महिन्यांत अनेकवेळा जलवाहिनी बंद ठेवण्यात आली. 

सीईटीपी ते ओवळेदरम्यान असलेली महाड औद्योगिक वसाहतीची पाइपलाइन जीर्ण झाली आहे. याबाबत सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने जुन्या पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्यास सांडपाणी वहनाचा प्रश्न उद्भवतो. – एस. एम. कवडगी, उपअभियंता महाड एमआयडीसी

Web Title: Leakage due to obstruction of sewer work; Companies in Mahad MIDC closed for 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.