मोहिली आरोग्य केंद्रात गळती

By admin | Published: July 25, 2016 03:05 AM2016-07-25T03:05:22+5:302016-07-25T03:05:22+5:30

तालुक्यातील मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने आरोग्य केंद्राला तळ्याचे स्वरूप आले आहे

Leakage in Mohihi Health Center | मोहिली आरोग्य केंद्रात गळती

मोहिली आरोग्य केंद्रात गळती

Next

कर्जत : तालुक्यातील मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने आरोग्य केंद्राला तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरु स्ती तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
कर्जत शहरात उपजिल्हा
रुग्णालय मंजूर झाल्यावर कर्जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोहिली येथे हालविण्यात आले.
सुरुवातीस प्राथमिक आरोग्य केंद्र हे एका खासगी जागेत सुरू होते. त्यानंतर एका शेतकऱ्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास जागा दिली आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २००९-२०१० मध्ये या ठिकाणी इमारत बांधण्यात आली. चार-पाच वर्षांपूर्वी बांधलेली इमारत गळत असल्याने ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज परिसरातील ६० ते ७० गरीब रु ग्ण आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत. मात्र इमारतीला गळती लागल्याने आज प्राथमिक आरोग्य केंद्रात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गळतीमुळे खुद्द आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्ण तपासण्यासाठी जागा नाही. त्यांचा कक्ष मोठ्या प्रमाणात गळत आहे. ज्या भागात रु ग्णांवर उपचार करण्यात येतात, तो हॉल गळत असल्यामुळे भिंती खराब झाल्या आहेत. छताचे प्लास्टर पडले आहे. (वार्ताहर)

Web Title: Leakage in Mohihi Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.