रोह्यात बिबट्याचा हल्ला

By admin | Published: March 23, 2017 01:40 AM2017-03-23T01:40:18+5:302017-03-23T01:40:18+5:30

तालुक्यातील जंगल भागात सतत पेटत असणारे वणवे व कडक उन्हाळ्याची झळ पोहचत असल्याने जंगलातील हिंसक प्राणी

Leopard attack in Roha | रोह्यात बिबट्याचा हल्ला

रोह्यात बिबट्याचा हल्ला

Next

रोहा : तालुक्यातील जंगल भागात सतत पेटत असणारे वणवे व कडक उन्हाळ्याची झळ पोहचत असल्याने जंगलातील हिंसक प्राणी व अन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावातील वस्तीलगत असणारे नाले, कालवा, छोट्या नदीवर येत असल्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बकऱ्यांचा कळप घेऊन परतणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मालकीच्या कळपावर हिंसक बिबट्याने अचानक हल्ला करत धुमाकूळ घातला. या हल्ल्यामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. या हल्ल्यात बिबट्याने १७ शेळ्यांसह चार बोकडांचा फडशा पाडला. तेथे असणारे शेतकरी व ग्रामस्थ नजीकच्या झाडावर चढल्याने सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यातून ते बचावले. या घटनेमुळे तालुक्यातील संभे कोलाड गाव व परिसरात घबराटीचे वातावरण पसले आहे.
रोहा-कोलाड मार्गावरील संभे गावातील शेतकरी सुरेश सुर्वे हे ६५ शेळ्यांच्या कळपासह जंगलात गेले होते. दिवसभर शेळ्या चरल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घरी परतीच्या मार्गावर असताना जंगलातील बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर भयानक हल्ला चढवत धुमाकूळ घातला. यामध्ये जवळपास १७ शेळ्यांसह ४ बोकडांचा समावेश असून त्यामध्ये १३ शेळ्या व चार बोकड मृत अवस्थेत घटनास्थळी सापडले. चार शेळ्या अद्याप बेपत्ता असल्याची माहिती कोलाड वनविभागाने दिली आहे. बिबट्यांकडून हिंसक हल्ला होत असताना शेतकरी मालक सुरेश सुर्वे, त्यांचे सहकारी महेंद्र जाधव, संजय वाघमारे यांनी जवळच्या झाडाचा आधार घेतला तर कळपातील उर्वरित शेळ्यांनी धाव घेत आपले खुराडे गाठले. सुदैवाने शेतकरी व त्यांचे दोन सहकारी बचावले. (वार्ताहर)

Web Title: Leopard attack in Roha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.