उरण परिसरात बिबट्याचा वावर; कामगारांमध्ये भीतीचं वातावरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 09:41 PM2023-04-20T21:41:12+5:302023-04-20T21:41:17+5:30

वन्यजीव संस्थाच्या सदस्यांनी अनेक वेळा असे प्राणी पकडून सुरक्षित जंगलात सोडले आहे. मार्च २०१६ मध्ये रानसई परिसरात बिबट्या आला होता. त्याचे चित्रणही  वनविभागाने केले होते.

Leopard movement in Uran area; An atmosphere of fear among workers | उरण परिसरात बिबट्याचा वावर; कामगारांमध्ये भीतीचं वातावरण 

उरण परिसरात बिबट्याचा वावर; कामगारांमध्ये भीतीचं वातावरण 

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील वेश्वी, रानसई,दिघोडे परिसरातील डोंगर आणि कंटेनर यार्ड परिसरात बिबट्या दिसला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. येथे एका कंटेनर यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी गुरुवारी (२० ) बिबट्या दिसल्याचे सांगितले. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

उरण परिसरातील पुर्व भाग कर्नाळा अभयारण्याच्या लगत आहे. जंगलाला लागून असल्यामुळे कर्नाळा अभयारण्यातून येणाऱ्या बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात पुर्वी मोर,रानडूक्कर, कोल्हे, लांडगे, तरस, ससे,रानमांजर, काळेमांजर, यासारखे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून यायचे. रस्त्यावरून जाणाऱ्या बसमधील प्रवाशांना अनेक वेळा या प्राण्यांचे दर्शन होत असे. मात्र गेल्या काही वर्षात येथील डोंगर सपाट करून जंगल तोडून येथे मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्ड उभारले आहेत. त्यामुळे येथील वनसंपदा व वन्य जीव जवळ जवळ संपुष्टात आली आहे. कधी कधी भेकर, कोल्हा, ससा, हरण यासारखे प्राणी भरकटून किंवा पाणी आणि खाद्याच्या शोधात या भागात येत असतात.

वन्यजीव संस्थाच्या सदस्यांनी अनेक वेळा असे प्राणी पकडून सुरक्षित जंगलात सोडले आहे. मार्च २०१६ मध्ये रानसई परिसरात बिबट्या आला होता. त्याचे चित्रणही  वनविभागाने केले होते. दोन वर्षापूर्वी गव्हआणफआटआ येथील वाघधोंडी जंगल व चिरनेर, कळंबुसरे, पुनाडे या जंगलात  बिबट्याचा पाहिल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्या येणे हे नविन नाही.आजही कामगारांनी परिसरात बिबट्या दृष्टीस पडला असल्याचे सांगितले जात आहे. वनविभागानेही केलेल्या एका सर्वेक्षणात उरण तालुक्यातील जंगलात बिबट्यांचा वावर आढळून आला असल्याचे उरण वनविभागाचे अधिकारी नथुराम कोकरे यांनी दिली.तसेच या परिसरात शोध घेतला असता काही प्राण्यांबरोबरच बिबट्यांच्या पायांचे  ठसे  परिसरातील  काही पाणवठ्यावर आढळून आले आहेत.त्यामुळे परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून येत असल्याचेही कोकरे यांनी स्पष्ट केले.मात्र आजच्या घटनेबाबत अद्यापही  बिबट्यांचा फोटो, व्हिडिओ कुणाकडून प्राप्त झाला नसल्याचेही कोकरे यांनी सांगितले.

Web Title: Leopard movement in Uran area; An atmosphere of fear among workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.