"दिवंगत प्रशांत पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 01:04 PM2024-06-28T13:04:06+5:302024-06-28T13:04:28+5:30
शोकसभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांची श्रद्धांजली.
मधुकर ठाकूर, उरण : दिवंगत प्रशांत पाटील आपल्यातुन निघून गेलेले नाहीत तर ते सर्वांच्याच हृदयात आहेत. त्यांचे विचार व कार्य असेच पुढे नेऊ या . त्यांचे स्वप्न पूर्ण करू अशा भावना महाविकास आघाडीच्या नेते, पुढारी,कार्यकर्त्यांनी उरण येथील आयोजित शोकसभेतुन व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रशांत पाटील यांचे २० जून २०२४ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने अकस्मीत निधन झाले.त्याच्या अकस्मीत मृत्यूनंतर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख व जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी गुरुवारी (२७) संध्याकाळी शोकसभेचे आयोजन केले होते. जेएनपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत उरणचे सुपुत्र, तरुण तडफदार आक्रमक नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेल्या प्रशांत पाटील यांना उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.या शोकसभेत व्यासपीठावर प्रशांत पाटील यांच्या मातोश्री हिरावती पाटील, पत्नी प्रज्ञा पाटील, मुले आदित्य व अद्वैत पाटील, भाऊ प्रवीण पाटील, राजस पाटील, कपिला पाटील, नूतन भट्टाचार्य आदी उपस्थित होते.
तर या प्रसंगी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, अखिल भारतीय कराडी समाजाचे अध्यक्ष मदन गोवारी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,माजी नगरसेवक झैद मुल्ला, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, काँग्रेस नेते आर. सी. घरत, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहून प्रशांत पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी जगजीवन भोईर, काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष रेखा घरत, कामगार नेते संतोष घरत, सूरदास गोवारी, ॲड. भार्गव पाटील,उरण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शेकाप महिला तालुकाध्यक्षा सीमा घरत, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, शिक्षक नेते नरसु पाटील, जेएनपीटी विश्वस्त रविंद्र पाटील, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, संतोष पवार, भूषण पाटील, दत्ता मसुरकर, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हाध्यक्ष सदानंद येलवे, उलवे शहर अध्यक्ष संतोष काठे, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभापती काशिनाथ पाटील, विविध राजकीय पक्ष , सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक, मित्र परिवार आदी शोकसभेला मोठया संख्येने सहभागी झाले होते.