बोर्र्लीपंचतन बाजारपेठेत वीजवाहक तारांवर अडकले पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:44 AM2020-06-10T00:44:05+5:302020-06-10T00:44:49+5:30

नागरिकांना धोका : संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी

Letters stuck on power lines in Borlipanchatan market | बोर्र्लीपंचतन बाजारपेठेत वीजवाहक तारांवर अडकले पत्रे

बोर्र्लीपंचतन बाजारपेठेत वीजवाहक तारांवर अडकले पत्रे

Next

दिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याला 'निसर्ग' चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्याने अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे कुठल्या कुठे उडून गेल्याने कित्येक कुटुंब उघड्यावर आले आहेत. याच पाश्र्वभूमीवर वादळातील अशीच एक उडालेली पत्र्याची शेड बोर्र्लीपंचतन बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर लोंबकळत असल्याने बाजारहाटासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक बनली आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळ ३ जून रोजी कोकण किनाºयावर दाखल झाले. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊन अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. या घटनेला आज आठ दिवस होत असताना बोर्लीकरांच्या डोक्यावर आणखी एक टांगती पत्र्याची शेड धोक्याची घंटा देत आहे. परिणामी अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शेड हटवण्याची मागणी येथील नागरिक सातत्याने करत आहेत. मात्र, याकडे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.
या वादळामध्ये तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसानीबाबत अघटित घटना ग्रामस्थांना संतापजनक ठरल्या आहेत. उलटसुलट वादळामुळे कोणती वस्तू कोणावर पडून मोठया प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या पत्र्याच्या शेडमुळे अशा घटनेची पुनरावृत्ती होऊन दुर्घटना घडू नये. त्यामुळे या लोंबकळणाºया धोकादायक पत्रा शेडला कोण हटवणार ? कोण पुढाकार घेणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे.
 

Web Title: Letters stuck on power lines in Borlipanchatan market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.