शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

कुंडलिका नदीची पातळी वाढली; पावसाचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:18 AM

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३६०.५० मिमी पावसाची नोंद

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीखाली वाहत आहे. शुक्र वारी (१९ जून) सकाळी १० वाजता नोंदविलेल्या जिल्ह्यातील या नद्यांच्या पाणी पातळीच्या अहवालानुसार, कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी ही २२.१० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या प्रमुख नद्या आहेत. रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३६०.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी शुक्रवारी २२.१० मीटर नोंदली गेली आहे. ही नदी धोका पातळीच्या खाली वाहत असली, तरी धोका पातळीपासून फार दूर नाही. नदीची इशारा पातळी डोलवहाळ बंधारा येथे २३ मीटर असून, धोका पातळी २३.९५ मीटर आहे. त्यामुळे २२.१० मीटर इतक्या पाणी पातळीवरून वाहणाºया नदीच्या सद्य:स्थितीचा अंदाज येतो. अंबा नदीची पाणी पातळी ६.२५ मीटर, सावित्री नदी ३ मीटर, पाताळगंगा नदी १८ मीटर, उल्हास नदी ४२ व गाढी नदी १.१० मीटर पातळीवरून वाहत आहे.चोवीस तासांतील पाऊस : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत अलिबाग तालुक्यात ४३ मिमी, पेणमध्ये ३४.२० मिमी, मुरु डमध्ये ३४ मिमी, पनवेल ४०.४० मिमी, उरणमध्ये १७ मिमी, कर्जत १३ मिमी, खालापूर १० मिमी, माणगांव १६ मिमी, रोहा २८ मिमी, सुधागड ९ मिमी, तळा २४ मिमी, महाड २.८० मिमी, पोलादपूर ७ मिमी, म्हसळा २३ मिमी, श्रीवर्धन १६ मिमी, तर माथेरानमध्ये ४३.२० मिमी असा एकूण २२.५३ मिमीच्या सरासरीने ३६०.५० मिमी पाऊस नोंदविण्यात आला.