शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

नियम मोडणाऱ्यांचा परवाना तीन महिने रद्द

By admin | Published: January 25, 2016 1:26 AM

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल, असा इशारा पनवेलचे परिवहन उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी दिला आहे.

खालापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल, असा इशारा पनवेलचे परिवहन उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी दिला आहे. मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आयोजित केलेल्या राज्य रस्ते सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी गगनगिरी आश्रमाचे विश्वस्त आशिषभाई यांच्यासह उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पनवेल लायन्स क्लबचे पदाधिकारी व वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभाग, रोटरी क्लब पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोल नाका येथे राज्य रस्ते सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता.वाहनचालक नियम पाळत नसल्याने रस्ता अपघातांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. रस्ता अपघातांमध्ये दर चार मिनिटाला एकाचा मृत्यू होत असून, ही चिंताजनक बाब आहे. अपघातांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असून, मद्यप्राशन, सीटबेल्ट, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक परवाने ३ महिन्यांसाठी रद्द करणार असल्याचे आनंद पाटील यांनी सांगितले. समाजाची मानसिकता ढासळत आहे. सर्वांची सुरक्षितता हेच जीवन मानले पाहिजे, असे मत डॉक्टर गिरीश गुणे यांनी व्यक्त केले.आजकालचे जग वेगवान झाले आहे. कुणालाही थांबायला वेळ नाही. त्यामुळे मन शांत ठेवून वाहने चालवा. इच्छित ठिकाणी पोचायला वेळ लागला तरी चालेल पण वाहने नियम पाळून चालवा, असे आवाहन गगनगिरी आश्रमाचे मुख्य विश्वस्त आशिषभाई यांनी केले. याप्रसंगी पनवेल रोटरी क्लबचे अध्यक्ष हितेन शाह, साहाय्यक अधिकारी सुरेंद्र निकम, आयआरबीचे अधिकारी गांधी यांच्यासह वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.