पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:21 AM2018-06-24T01:21:07+5:302018-06-24T01:21:16+5:30

वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अतिवृष्टीने श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Life-threatening disruption due to rain | पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Next

श्रीवर्धन : वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अतिवृष्टीने श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळात अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. सतत पडणाºया पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत.
श्रीवर्धन तालुक्याच्या तिन्ही बाजूने समुद्र असून पावसाबरोबरच उधाणाच्या भरतीचाही किनारी गावांना धोका आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील खोलगट भागात पाणी साचते. नगरपालिका ते तहसील कार्यालयादरम्यानचा रस्ता चिखलमय झाला आहे. एसटी स्टँडच्या समोरील बाजूस पाणी साचते. अवघ्या काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनच्या जीवना बंदराजवळ झालेल्या वादळाने अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्यात आले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावर कोंडविल, तर समुद्र किनाºयाच्या आदगाव, सर्वा, नानवेली व दिघी या गावातील हद्दीत दरडण्याची शक्यता आहे. आदगाव, सर्वा व नानवेली या तिन्ही गावांच्या वाहतुकीचे रस्त्याच्या दुतर्फा डोंगर व दाट वनराई आहे. आदगाव सर्वा रस्त्याच्या कामासाठी उजव्या बाजूला असलेला डोंगरात खोदकाम सुरू असल्याने आदगाव सर्वा रस्ता दरडप्रवण क्षेत्र बनू शकतो.
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आदगाव कुणबी वाडीचा जोड रस्ता अक्षरश: वाहून गेला आहे. कुणबी वाडीची लोकसंख्या १५० च्या आसपास आहे. जोड रस्त्याच्या शेजारील शेतकरी राजेंद्र शिंदे यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. जोड रस्ताच वाहून गेल्यामुळे दळणवळणास अडचणी येत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील वावे, नागलोली, धनगरमलई, आडी, कोलमांडला, जावेळे, गडबवाडी भागात दाट जंगल आहे. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडे कोसळली आहेत.
 

Web Title: Life-threatening disruption due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.