अलिबाग :
पेण तालुक्यातील अनेक भागात काल बुधवारी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या दरम्यान भाल गावातील देविदास म्हात्रे (६४) यांच्या घरावर वीज कोसळली. यावेळी देविदास म्हात्रे व त्यांच्या पत्नी घरातच होते. सुदैवाने दोघेही बचावले. मात्र त्यांच्या घराच्या छपराला मोठे भगदाड पडले आहे. घरातील विजेची उपकरणे व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे.
रायगडात बुधवारी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळनंतर पावसाने जोरदार सुरुवात केली होती. पेण तालुक्यात अतिवृष्टी होऊन ढगफुटी सारखा पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसासह विजांचा खेळ ही सुरू होता. ढगातून कोसळणारी वीज भाल गावातील देविदास म्हात्रे याच्या घरावर कोसळली. देविदास म्हात्रे आणि त्याची पत्नी असे दोघेच जेष्ठ नागरिक घरात होते. सुदैवाने दोघेही बचावले असून घराचे आणि वस्तूचे आर्थिक नुकसान झाले आहे.