रोहा : तालुक्यातील चणेरा विभागात गावठी दारू निर्मितीचे असंख्य बेकायदा धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईत लाखो रुपये किमतीची गावठी दारू जप्त व दारू विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे. असे असताना या भागासमवेत तालुक्यात कानाकोपºयात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ, नवसागराच्या कांड्या व अन्य साहित्य बेकायदा पद्धतीने विकणाºया व्यापाºयांच्या गोडावूनवर रोहा पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली. या कारवाईत सव्वा लाख रुपयेहून अधिक रकमेचे साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचप्रमाणे गेली कित्येक वर्षे काळ्या गुळाचे साम्राज्य निर्माण करणाºया येथील व्यापाºयाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.रोहा तालुक्यातील चणेरा बाजारपेठेत एका व्यापाºयाकडून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ, नवसागराच्या कांड्या व अन्य साहित्य विक्र ी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पो.नि.संदीप येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.प्रशांत तायडे, पो.ना.राजेंद्र भोनकर, पो.ना.पारवे, पो.ह.नामे आदींच्या पथकाने चणेरा येथील केसरीमल देविचंद कोठारी (६१ वर्षे) यांच्या मालकीच्या बेकायदा गोडावूनवर पोलिसांनी छापा टाकून काळ्या गुळाच्या व्यापाºयांना धक्का दिला. या ठिकाणी पांढºया रंगाच्या पुठ्ठ्याचे १३५ बॉक्स आढळून आले. यामध्ये १लाख ८ हजार ४०० रु. किमतीचे काळ्या गुळाचे ८८ बॉक्स तसेच ११,२०० रु. किमतीचे १० कागदी पुठ्ठ्याचे नवसागराच्या ५६० कांड्या असलेले बॉक्स आढळून आले आहेत. असे एकूण १ लाख २९ हजार ६०० रु. किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. चणेरा भागात काळा गूळमाफिया केसरीमल कोठारी याला पोलिसांनी अटक केली आहे व त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे व सीआरपीसी ४१ प्रमाणे नोटीस बजावली आहे.दारूभट्ट्यांवर कारवाईनेरळ : महिनाभरापासून नेरळ पोलिसांकडून अनेक ठिकाणच्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बुधवारी नेरळ-बेकरे येथील धबधब्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या भट्ट्या नेरळ पोलिसांनी नष्ट केल्या. त्यातील सुमारे ५० हजारांचा माल नेरळ पोलिसांनी जप्त केला आहे. महिनाभरात चौथ्यांदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाला.नेरळ पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे बेकरे येथील जंगलात दारूभट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता, त्या त्याठिकाणी हातभट्टीवर दारू गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली पत्र्याची टाकी, त्या टाकीमध्ये मध्यभागी अंदाजे ५० लिटर गावठी दारू तयार करण्याचे गूळ, नवसागर पाणीमिश्रित रसायन, एकूण ६ पत्र्याच्या टाक्या व ४ प्लॅस्टिक टाक्या व त्यामध्ये २०० लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये अंदाजे १५० लिटर गूळ व नवसागर असा सुमारे ५० हजाररु पयांचे रसायन मिळाले आहे.वनविभागाची कारवाई : शंभर लिटर गावठी दारूसह सामान केले नष्टसुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याचा बहुतांश भाग दुर्गम, जंगलमय, डोंगर माळरान पठार व वनाच्छदित आहे. जंगलभागात गावठी दारू व निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे वनविभाग व पोलिसांमार्फत करण्यात येणाºया कारवाईवरून स्पष्ट होताना दिसत आहे. वनक्षेत्रपाल सुधागड वनपाल खांडपोली यांनी गस्ती पथकाला चंदरगाव येथे दारूभट्टी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खांडपोली वनपाल रवींद्र जुवळे, चंदरगाव वनरक्षक जे. ई. नाईक, आंबोले वनरक्षक एन. एस. नागरगोजे व पडसरे वनरक्षक आर. पी.टिके यांच्या पथकाने चंदरगाव येथे जावून तपासणी केली. चंदरगाव येथील एका नाल्याची पाहणी केली असता तेथे दारूभट्ट्या असल्याचे या पथकाला दिसून आले. या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून तेथे मिळालेली नव्वद ते शंभर लिटर गावठी दारू, दोन पिंप, दोन ड्रम, एक टाकी व एक बादली असे सामान फोडून नष्ट करण्यात आले. या दारूभट्ट्यांजवळ कोणीही नव्हते. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड झाली असल्याचे निदर्शनास आले नाही.
दारूचे साहित्य जप्त, एकास अटक; सव्वा लाखाचे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:05 AM