शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

काशिद किनारी जीवरक्षकांमुळे वाचले तिघांचे प्राण

By admin | Published: January 14, 2017 6:57 AM

मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारा हा सुप्रसिद्ध असून येथे दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असतात. सफेद वाळू

नांदगाव/ मुरुड : मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारा हा सुप्रसिद्ध असून येथे दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असतात. सफेद वाळू व निळाशार समुद्र पर्यटकांना भुरळ घालत असल्याने येथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते. पुणे येथील धनकवडीजवळ असणारे पुणे इन्स्टिट्यूट आॅफ कॉम्पुटर टेक्नॉलॉजी येथील १५ जणांचा समूह काशिद समुद्रकिनारी फिरावयास आला होता. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान हे सर्वजण या ठिकाणी पोहचताच यातील १५ जण ही समुद्रात पोहावयास उतरले. काही वेळातच यातील तिघे जण खोल समुद्रात ओढले गेले. मात्र जीवरक्षकांमुळे या तिघांचे प्राण वाचले.राजीव शर्मा, अक्षय जैन, अजय शर्मा हे तिघे खोल भागात गेल्याने त्यांनी मदतीची याचना केली. त्या सर्वांचा ओरडा पाहून समूहातील सर्वजणांनी मदतीची हाक मारली. समोरच स्पीड बोटीत जीवरक्षक तैनातच होते त्यांनी वेळ जाऊ न देता आपली बोट हे तिघे बुडत असलेल्या ठिकाणी नेली सर्व जीवरक्षकांनी त्वरित समुद्रात उडी घेत या सर्वाना बोटीत चढून सुखरूप किनाऱ्यावर आणले. तिघांना सुखरूप पाहून सर्व सहकाऱ्यांनी जीवरक्षकांचे आभार मानले. जीवरक्षक राकेश रक्ते, दीपेश पवार, अमोल कासार, अनिल वाघमारे, भरत वाघमारे, सुनील वाघमारे या सर्वांचे काशीद ग्रामपंचायत सरपंच सविता वाळेकर आदींनी कौतुक के ले.