शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

श्रीवर्धनमध्ये पशुसंवर्धन सेवेचा उडाला बोजवारा; उपलब्ध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 2:43 AM

श्रीवर्धन, बागमांडला, दांड्गुरी, बोर्लीपंचतन, दिघी, सायगाव या ठिकाणी श्रेणीनुसार पशुसंवर्धन सेवा पुरवली जाते.

- गणेश प्रभाळेदिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाºया व असंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारा पशुपालन व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या संख्येने जनावरे असतानादेखील त्यांच्यावर उपचाराची मात्र प्रभावी यंत्रणा नाही. या ठिकाणी असलेले लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात दोन वर्षांपासून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम जनावरांच्या उपचारावर होत असून, वारंवार मागणी आणि गरज असताना ग्रामीण भागातील पशुसंवर्धन सेवेकडे दुर्लक्ष होत आहे.श्रीवर्धन, बागमांडला, दांड्गुरी, बोर्लीपंचतन, दिघी, सायगाव या ठिकाणी श्रेणीनुसार पशुसंवर्धन सेवा पुरवली जाते. काही ठिकाणी पशुवैद्यकीय चिकित्सालयाची विशाल इमारत शासनाने लाखो रुपये खर्चून बांधली आहे, परंतु सध्या ती निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी वगार्तून तीव्र संताप व्यक्त होत असून, पर्यवेक्षक, अधिकाºयांविना पशुचिकित्सालय असून अडचण, नसून खोळंबा अशीच झाली आहे.ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये पशुधन पर्यवेक्षकाकडून जनावरांवर उपचार केले जातात. परंतु शस्त्रक्रियांसारख्या बाबींसाठी शेतकरी आपली जनावरे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशू चिकित्सालयात आणतात. या चिकित्सालयाशिवाय शेतकºयांपुढे दुसरा पर्याय नाही, परंतु या ठिकाणी अपेक्षित असा उपचार पशुंना मिळत नाही.विविध रिक्त पदे, औषधींचा तुटवडा अशा बाबी या ठिकाणी नित्याच्याच झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचा लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ दिसून येतो. श्रीवर्धन तालुक्यातील तीन श्रेणी एकचे दवाखाने असताना एकाच पशुधन विकास अधिकाºयावर तीन इतर पदांचा अतिरिक्त भर आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अधिकाºयांना पोचता येत नाही.तालुक्यात नऊ पदे रिक्तश्रीवर्धन तालुक्यात नऊ पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे विविध रोगाच्या लसीकरणावरही परिणाम होत आहे. तालुक्यात पशुधन सेवा देण्यासाठी, तसेच लाळ खुरकत, कृत्रिम रेतन, विविध आजार हटविण्यासाठी लसीकरण मोहीम पशू चिकित्सालयातून राबविली जाते. तर काही ठिकाणी उपकेंद्र असून कर्मचारी नाही. सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचारी सेवेसाठी कमी पडत आहेत. परिणामी, तालुक्यातील पशुसंवर्धन सेवा प्रचंड अस्थिपंजर झाल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध असलेले लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात मोठी कसरत करावी लागत असल्याची प्रतिक्रिया येथील अधिकारी व कर्मचाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अतिरिक्त कार्यभारश्रीवर्धन तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी एम. जि. शिसोंदे यांच्याकडे श्रीवर्धन, बागमांडला व पंचायत समिती विस्तार या अधिकाºयांचा अतिरिक्त कार्यभार आहे.रिक्त पदेपशुधन विकास अधिकारी २विकास अधिकार (विस्तार) १पशु पर्यवेक्षक १व्रणोप्रचारक २शिपाई ३

रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असून मागणी करत आहोत. पुढे लवकरच होणाºया नव्याने भरतीनुसार रिक्त पदे भरली जातील अशी माहिती वरिष्ठांकडून माहिती मिळत आहे.- उज्ज्वला आठवले, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड