Lockdown News: लॉकडाउनमुळे वाहने अडकली; पोषण आहारात तेलच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:34 AM2020-05-05T00:34:02+5:302020-05-05T00:34:32+5:30

शिथिलता मिळाल्याने वाटपाला आली गती

Lockdown News: Vehicles get stuck due to lockdown; There is no oil in the nutritional diet | Lockdown News: लॉकडाउनमुळे वाहने अडकली; पोषण आहारात तेलच नाही

Lockdown News: लॉकडाउनमुळे वाहने अडकली; पोषण आहारात तेलच नाही

Next

आविष्कार देसाई

अलिबाग : गरजवंतांसाठी असणाऱ्या पोषण आहाराचे वाटप रायगड जिल्ह्यात करण्यात आले आहे. मात्र लॉकडाउनमुळे तेलाचा पुरवठा करणारी वाहने अडकून पडल्याने लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातील पोषण आहारात तेलाचा पुरवठा होऊ शकला नव्हता. त्यामुळे पोषण आहाराला तेलाची फोडणीच देता न आल्याचे समोर आले आहे. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने लाभार्थ्यांना तेलाचा पुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यामध्ये ३ मेपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची १२८ संख्या आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग झाल्याने जिल्ह्याचा आकडा हा फुगल्याचे स्पष्ट दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग हे सहा तालुके एमएमआरडीएमध्ये येत असल्याने या तालुक्यांमध्ये विशेष सूट मिळत नसल्याने व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये अशीच परिस्थिती दिसून येते.

कोरोनाच्या कालावधीत सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी सुमारे साडेपाच हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून पोषण आहार घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने एप्रिलमध्येच व्यवस्था केली होती. लाभार्थ्यांना गहू, मूगडाळ, तांदूळ, मटकी, हळद पावडर, मिरची पावडर, मीठ असा पोषण आहार दिला जातो. मात्र मार्च महिन्यामध्ये तेल मिळाले नाही तर काही ठिकाणी तेल मिळाले, परंतु गहू मिळाले नसल्याचेही काही पालकांचे म्हणणे आहे.

एकही तक्रार समितीकडे नाही
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोषण आहारातील लाभार्थ्यांना थेट घरात जाऊन वाटप करण्यात येत आहे. तक्रार निवारण समितीची स्थापना के ली,मात्र अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. एप्रिलमध्ये वाटप झाले. मे महिन्याच्या १५ तारखेला पुन्हा पोषण आहार देण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - नितीन मंडलीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व वस्तू मिळाल्या, पण तेल नाही
गहू, मूगडाळ, तांदूळ, मटकी, हळद पावडर, मिरची पावडर, मीठ असा न शिजवता पोषण आहार कोरोना काळापासून दिला जातो. घरपोच हा आहार दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला. मात्र मार्च महिन्यामध्ये या सर्व वस्तू मिळाल्या होत्या, त्यामध्ये सोयाबीन तेलाचा अभाव होता. एप्रिलमध्ये तेल मिळेल असे वाटले, मात्र ते मिळाले नाही. - सिद्धी पुरकर, पालक, राजेवाडी-नवघर

सोशल डिस्टिन्सिंगचे योग्य पालन
कोरोनाच्या आधी शिजवलेले अन्न दिले जायचे, मात्र आता न शिजवलेल्या धान्याची पाकिटे लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत. घरोघरी जाऊन त्याचे वाटप केले. त्यामुळे गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न नव्हता. आम्हाला मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर देण्यात आले आहे. पोषण आहारामध्ये तेलाचा अभाव होता. आता मात्र लाभार्थ्यांना तेलाचे वाटप करण्यात येत आहे. - श्रेया घरत अंगणवाडी सेविका, बागमळा

कोरोनामुळे घरपोच दिला पोषण आहार
कोरोनाच्या कालावधीत सर्व लाभार्थ्यांपर्यंत सुमारे साडेपाच हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून पोषण आहार घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने एप्रिलमध्येच व्यवस्था केली होती. सुरुवातीला पोषण आहार घेऊन जाणारी वाहने स्थानिक गाव पातळीवर कोरोनाच्या भीतीने अडवण्यात येत होती. मात्र वरिष्ठ पातळीवरून संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना आल्यानंतर त्यांचा विरोध मावळला होता.

न शिजवताच दिला पोषण आहार
कोरोनाची दहशत एवढी भयानक होती की सुरुवातीला सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवताना बºयाच अडचणींचा सामाना करावा लागला होता. पोषण आहार अशी योजना आहे की त्यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता आणि तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी अन्न दिले जाते. कोरोनाच्या आधी हे अन्न शिजवून दिले जात होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लाभार्थ्यांना न शिजवताच हा पोषण आहार देण्यास सरकारने सुरुवात केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांपर्यत आहार पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Lockdown News: Vehicles get stuck due to lockdown; There is no oil in the nutritional diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.